विवाहाचे यंदा ६३ मुहूर्त
By Admin | Updated: January 20, 2015 02:10 IST2015-01-20T02:10:17+5:302015-01-20T02:10:17+5:30
मंगळवारी पौष संपणार असून, शनिवारपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहे. जुलै ते आॅक्टोबर हा चातुर्मास वगळता ६३ मुहूर्त आहेत.

विवाहाचे यंदा ६३ मुहूर्त
स्नेहा पावसकर - ठाणे
मंगळवारी पौष संपणार असून, शनिवारपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहे. जुलै ते आॅक्टोबर हा चातुर्मास वगळता ६३ मुहूर्त आहेत.
डिसेंबरमध्ये सर्वाधिक १४ तर फेब्रुवारी आणि मेमध्ये प्रत्येकी १३ मुहूर्त आहेत. जानेवारीमध्ये २४, २५, २६, २९, फेब्रुवारीमध्ये ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, २१, २२, २३, २६, २७, मार्चमध्ये ४, ७, ९, १०, १२, १७, एप्रिलमध्ये २१, २७, २८, ३०, मे महिन्यामध्ये २, ४, ५, ६, ७, ८, ९, ११, १४, १५, २७, २८, ३०, जूनमध्ये २, ४, ६, ७, ११, १२ ला मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये २४, २६, २७ ला तर डिसेंबरमध्ये ४, ६, ७, ८, १४, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३०, ३१ ला विवाह मुहूर्त आहेत. चातुर्मासाचा सोडल्यास आठ महिने मुहूर्त आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत विवाह करीत नाहीत. हा साधारण दोन महिन्यांचा काळ असतो. परंतु यंदा तो चातुर्मासातच येत असल्याने त्याचा विवाहोत्सुकांना कोणताही अडथळा होणार नाही, असे ज्येष्ठ पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.