यंदाही बाबासाहेबांचा नवीन खंड नाही
By Admin | Updated: April 14, 2016 01:21 IST2016-04-14T01:21:43+5:302016-04-14T01:21:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याच्या

यंदाही बाबासाहेबांचा नवीन खंड नाही
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. या समितीकडून बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्याचे ४२ खंड प्रकाशित होणार होते. ३६ वर्षात २२ खंड व २ संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सन २००४ पासून बाबासाहेबांच्या साहित्याचा एकही खंड प्रकाशित झालेला नाही. सन २००६ व २०१० प्रकाशित खंड २१ व २२ हे चुका व त्रुटीमुळे वादग्रस्त ठरले. यानंतर सुधारित खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी होत असताना हे काम सरकारने मार्गी लावायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.