शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

झाडीपट्टीत यंदा झगमगाट, कलावंतांचे चेहरे उजळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 5:27 AM

Chandrapur : नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते.

- घनश्याम नवघडे

नागभीड (जि. चंद्रपूर) : झाडीत पुन्हा लगबग सुरू झाली आहे. नाट्य संस्थांच्या कार्यालयांची कुलुपं उघडली आहेत. नाटकांच्या स्क्रिप्टवरील धूळ झटकली गेली आहे. कोपऱ्यात बांधून ठेवलेली वाद्ये बाहेर निघाली आहेत. नाटकं बूक होऊ लागली आहेत. तालमी सुरू झाल्या आहेत. कलावंतांचे चेहरे उजळले आहेत. झाडीपट्टी पुन्हा नव्या जोमानं कलाविष्कारासाठी सज्ज झाली आहे.

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगावर लादण्यात आलेल्या मर्यादा उठविण्यात आल्याने अवघी झाडीपट्टी रंगभूमी आनंदली आहे. सुमारे ५० कोटींच्या उलाढालीस चालना मिळणार असल्याने दोन वर्षांपासून तंगीत असणाऱ्या कलावंतांना यंदा चांगले दिवस दिसतील. मुंबई - पुण्यातील कलावंतांनाही आधार होईल. नाटक हा झाटीपट्टीचा अविभाज्य घटक आहे. ‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत रूढ झाली आहे.

नाटकांचा काळ दिवाळीपासून सुरू होऊन होळीपर्यंत चालतो. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चार प्रमुख जिल्ह्यांतील बहुतेक गावांत मंडईचे आयोजन होते. अलिकडे नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले आहे. एवढेच कशाला, झाडीपट्टीची जादू शेजारच्या आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही दिसायला लागली आहे. झाडीच्या चार जिल्ह्यांत जवळपास ५५ नाटक कंपन्या आहेत. एक कंपनी एका नाट्यप्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारते. होळीपर्यंत अडीच हजारावर प्रयोग होतात.

यांनाही रोजगार नाट्य कलावंत, निर्माते, वेशभूषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाटवादक व इतर संबंधितांना अर्थप्राप्ती होतेच. नाटकासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा-पाणी विकून उपजीविका चालविणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळेल.

झाडीपट्टी रंगभूमी मुळातच श्रीमंत असली तरी कलाकार मात्र गरीब आहेत. कोरोना आपत्तीमुळे अनेक कलाकारांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले. आता नाट्यप्रयोगांना परवानगी मिळाल्याने पूर्वीचे गतवैभव प्राप्त होईल.- सदानंद बोरकर, लेखक-निर्माता, नवरगाव

शासनाने ठरवून दिलेल्या अटींचा झाडीपट्टी महामंडळ आदर करते. मात्र, खेड्यापाड्यात नाटकांना परवानगी देताना अडथळे निर्माण करू नयेत. गेली दोन वर्षे बंदी असल्याने अनेक कलाकारांचे हाल झाले. आता निश्चित बरे दिवस येतील.- अनिरुद्ध वनकर, अध्यक्ष, झाडीपट्टी मंडळ

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021