यवतमाळमध्ये शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा
By Admin | Updated: January 16, 2017 23:32 IST2017-01-16T22:19:19+5:302017-01-16T23:32:22+5:30
बाजीराव महाराज महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे.

यवतमाळमध्ये शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा
ऑनलाइन लोकमत
वणी (यवतमाळ),दि.16 - येथील सुकनेगाव येथे बाजीराव महाराज महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. आज संध्याकाळी सदर घटना घडली असून सर्व रुग्णांना उपचारार्थ वणी येथील ग्रामीण रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रात्री १० वाजतानंतरही रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे वणीत आणण्यात येत होते. दरवर्षी १६ जानेवारीला सुकने गावात बाजीराव महारांजाच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमासाठी आंध्रप्रदेशासह यवतमाळ जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. रुग्णालयांसमोर नागरिकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असून रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.