शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये कर्जमाफीसाठी शेतक-याचे झाडावर चढून आंदोलन, प्रशासनाकडून मनधरणी सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 12:40 IST

शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे.

यवतमाळ : शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या सोबत विषाची बॉटल असून त्याच्या समर्थकांनी यवतमाळ-आर्णी मार्गावर वाहतूक रोखून धरली.  प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न चालविले असले तरी तो आपल्या आंदोलनावर ठाम आहे.

धनंजय राजेंद्र वानखेडे  (३८) असे आंदोलनकर्त्या शेतक-याचे नाव आहे. तो दारव्हा तालुक्यातील शेंद्री डोल्हारी येथील रहिवासी आहे. यावर्षी त्याने अर्जुना येथे मक्त्याने शेत घेतले आहे. रविवारी सकाळी तो पत्नी आणि काही महिलांसह शेतात पोहोचला. सोबत विषाची बॉटल होती. काही वेळात तो एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला.  त्याचवेळी त्याच्या सोबतच्या महिलांनी यवतमाळ-आर्णी मार्गावरील वाहतूक रोखून धरली.  तत्पूर्वी त्याने झाडाला आमरण उपोषण असे फलक झाडाला बांधले होते.  

आपल्या मागण्यांची चिठ्ठी त्याने झाडावरून खाली फेकली. त्यात सर्व शेतक-यांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये द्या, शेतक-यांचा सातबारा कोरा करा, असे लिहिलेले आहेत. या घटनेची माहिती दिनेश जयस्वाल यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार संजय डहाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळात नायब तहसीलदार नरेंद्र थुटे, मंडळ अधिकारी गुल्हाने त्या ठिकाणी आले. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धनंजयला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु तो कुणाचेही ऐकायच्या मन:स्थितीत दिसत नाही. कुणी वर चढल्यास मी झाडावरुन उडी मारील, असे तो सांगत आहे. तसेच त्याच्यासोबत विषाची बॉटल असल्यानेही प्रशासन हादरुन गेले आहे. 

विशेष म्हणजे धनंजयने गतवर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन करीत विषप्राशन केले होते. तर यापूर्वी एका मोबाईल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते. वृत्तलिहिस्तोवर तो झाडावरच चढून आहे. या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकही त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी