यवतमाळमध्ये भररस्त्यात विद्यार्थिनीची हत्या
By Admin | Updated: September 18, 2015 19:13 IST2015-09-18T19:13:16+5:302015-09-18T19:13:16+5:30
यवतमाळमधील दत्तात्रय नगर येथे १७ वर्षाच्या विद्यार्थिनीची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.

यवतमाळमध्ये भररस्त्यात विद्यार्थिनीची हत्या
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १८ - यवतमाळमधील दत्तात्रय नगर येथे १७ वर्षाच्या विद्यार्थिनीची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सोनाली गणेश कन्नाके असे या मुलीचे नाव असून हल्ल्यानंतर मारेक-याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.
सोनाली कन्नाके ही शुक्रवारी दुपारी कॉम्प्यूटर क्लासवरुन घरी परतत असताना दत्तात्रय नगर येथे अज्ञात व्यक्तीने सोनालीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोनालीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोनालीचा मृत्यू झाला. या घटनेने यवतमाळमध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.