यशवंत पाध्ये यांचे निधन

By Admin | Updated: October 5, 2014 01:25 IST2014-10-05T01:25:29+5:302014-10-05T01:25:29+5:30

ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत पाध्ये (74) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाल़े त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आह़े

Yashwant Padhye passed away | यशवंत पाध्ये यांचे निधन

यशवंत पाध्ये यांचे निधन

>पुणो : ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत पाध्ये (74) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाल़े त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आह़े पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल़े  
पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे पाध्ये हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील होते. अर्थशास्त्रत बी़ ए़ केल्यानंतर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी स्वीकारली. 36 वर्षे नोकरी करीत असतानाच साहित्य, पत्रकारितेच्या क्षेत्रत ते अखंड कार्यरत होत़े महाराष्ट्र संपादक परिषद या राज्यस्तरावरील संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होत़े सध्या ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहात होत़े पाच दशकांत त्यांनी 5क् पुस्तके लिहिली.

Web Title: Yashwant Padhye passed away