यशोदा हायब्रीड सिड्सवर छापा
By Admin | Updated: July 8, 2016 00:44 IST2016-07-08T00:44:26+5:302016-07-08T00:44:26+5:30
पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाच्या चमूने गुरुवारी हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स या कंपनीवर छापा टाकला. या वेळी कंपनीतील ८४३.९६ क्विंटल

यशोदा हायब्रीड सिड्सवर छापा
वर्धा : पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाच्या चमूने गुरुवारी हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सिड्स या कंपनीवर छापा टाकला. या वेळी कंपनीतील ८४३.९६ क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व इतर जिल्ह्यांत यशोदा हायब्रीड सिड्स अॅण्ड राजझिंग सन्स कंपनीच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली; परंतु शेतकऱ्यांनी पेरणी केली
असता नागपूर व चंद्रपूर
जिल्ह्यांत या बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. (प्रतिनिधी)