म्हसळ्यात यश कर्णिक प्रथम

By Admin | Updated: June 8, 2016 02:25 IST2016-06-08T02:25:08+5:302016-06-08T02:25:08+5:30

दहावीचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.२५ टक्के लागला.

Yash Karnik first in Mhashal | म्हसळ्यात यश कर्णिक प्रथम

म्हसळ्यात यश कर्णिक प्रथम


म्हसळा : दहावीचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.२५ टक्के लागला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार अवधूूत तटकरे यांच्या हस्ते आगरी समाजगृहात करण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा एकूण निकाल ९३.१५ टक्के लागला असून यश कर्णिक प्रथम आला असून त्याने ८८.२० टक्के गुण मिळविले. ऐश्वर्या सुतार द्वितीय, तिला ८७.२० टक्के , तर ८६ टक्के गुण मिळवून प्रणया खोत तृतीय आली. मागासवर्गीयांमध्ये जुई साळवी हिने ७३.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्र मांक मिळविला. ८८.२० टक्के गुण मिळवून अंजुमन-ई-इस्लाम हायस्कूल म्हसळ्याचा अ.रहीम अ.रहमान घराडे हाही विद्यार्थी प्रथम आला असून द्वितीय क्र मांक सारा जाविद फनसमीयाने मिळविला असून तिला ८६.६० टक्के गुण मिळाले. तृतीय क्र मांकावर सुजाना परदेसी असून ८४ टक्के गुण मिळविले. शाळेचा एकूण निकाल ८९.१३ टक्के लागला.
पी.एन.पी. हायस्कूलमध्ये ८४.६० टक्के गुण मिळवून रविना रिकामे प्रथम, अनमोल लाड ७९.४० द्वितीय, तृतीय सुयोग दुर्गवले ७८.४० टक्के तसेच जिजामाता हायस्कूल कोलवटमध्ये ऋ तिक शिंदे प्रथम ७२ टक्के, द्वितीय क्र मांक सागर पोस्टुरे ६९ टक्के, प्रतीक मोरे याने ६७ टक्के गुण मिळवून तिसरा क्र मांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.अवधूत तटकरे यांनी अभिनंदन के ले.
>सुएसो कुरुळ शाळेचा ७५ टक्के निकाल
अलिबाग : सु.ए.सो. कुरुळ माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०१६ माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला आहे. एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रुती प्रभाकर सुजाता गोंधळी ही विद्यार्थिनी ७७.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे स्थानिक व्यवस्थापन समिती प्रमुख अ‍ॅड. प्रसाद पाटील व मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
>अग्रवाल विद्यामंदिर @ ९४.७० टक्के
नागोठणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागीय मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर झाला. कोएसोच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिरचा निकाल ९४.७० टक्के इतका लागला असून १८९ पैकी १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रसन्न वाघ हा विद्यार्थी ९०. ६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला, ऋ तुजा देवकाते ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर दीप्ती सकपाळने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक मिळविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सदस्य अनिल काळे, अब्बास नागोठणावाला, मुख्याध्यापक एस.पी. कांबळे यांच्यासह शिक्षकवर्गाने कौतुक केले आहे.
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.डी.परमार शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा सलग तेराव्या वर्षीही कायम राखली आहे. मुस्कान धनसे आणि पायल खंडागळे या विद्यार्थिनींनी ८६.४० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मोमिना खान ८६ टक्के आणि राहुल श्रीवास्तव ८४. २० टक्के यांनी अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय क्र मांक मिळविला. आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून प्रथम श्रेणीत नऊ विद्यार्थी आहेत.
नवी सोशियल अ‍ॅन्ड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल्स शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्वामिनी जाधव ही विद्यार्थिनी ८९.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली असून अभिझेर काचवाला आणि निधी भानुशाली ८७.२० टक्के, तर जतीन तेरडे ८५ टक्के गुण मिळवून अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सीमा मुल्कवाड मुख्याध्यापक विजय मुल्कवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
शेतकऱ्याचा मुलगा
अंबानी शाळेत प्रथम
नागोठणे : पेण तालुक्यातील शिहू या खेडेगावातील दिलीप पाटील या शेतकऱ्याच्या निमिष या पुत्राने दहावीच्या परीक्षेत येथील जे.एच. अंबानी पेट्रोकेमिकल्स विद्यालयात प्रथम येण्याची किमया साधल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निमिषने मिळविलेल्या यशाबद्दल शिहू गावाचे नाव निश्चितच उंचावले असल्याची प्रतिक्रि या सरपंच भास्कर म्हात्रे, पेण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मोकल, पेण तालुका भाजपाचे उपाध्यक्ष हिरामण मोकल यांनी व्यक्त केली आहे. निमिषच्या यशाबद्दल शिहू ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा कौतुक सोहळा घेण्यात येवून त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच भास्कर म्हात्रे, पेण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मोकल आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Yash Karnik first in Mhashal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.