यादवच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: September 10, 2016 02:23 IST2016-09-10T02:23:10+5:302016-09-10T02:23:10+5:30

माथाडी कामगारांच्या बोगस घरवाटप प्रकरनी अटकेत असलेल्या दिलीप यादवच्या पोलीस कोठडीत वाढ झाली

Yadav's police custody extended | यादवच्या पोलीस कोठडीत वाढ

यादवच्या पोलीस कोठडीत वाढ


नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या बोगस घरवाटप प्रकरनी अटकेत असलेल्या दिलीप यादवच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान एपीएमसी पोलीसांनी पाहिजे असलेल्या संतोष चव्हाणला देखिल अटक केली आहे. तपासात यादवच्या विविध बँक खात्यामधुन इतर बँक खात्यामध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती पोलीसांसमोर उघड झाली आहे.
नेत्यांच्या कोट्यातुन माथाडी कामगारांची घरे बिगर माथाडी कामगारांना मिळवुन देतो असे सांगुन अनेकांची कोट्यावधीची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी दिलीप यादवला अटक केली आहे. दिलीप यादव हा राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चा कर्मचारी असुन गेली दिड ते दोन वर्षापासुन तो हा प्रकार करत होता. यादरम्यान युनियनची पत्रे व पदाधीकारयांच्या सह्यांच्या शिक्यांचा गैरवापर करुन हा प्रकार केला आहे. यादवकडून युनियनच्या पत्राचा वापर होत असल्यामुळे हमकास घरे मिळतील असा विश्वास ठेवुन अनेकांनी त्याच्याकडे लाखो रुपये दिले आहेत. त्यापैकी सुमारे दिडशे जणांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आहे. यादवच्या अटकेनंतर पोलीसांनी त्याच्या बँक खात्यातील व्यवहाराच्या चौकशीला सुरवात केली होती. त्यामध्ये यादवच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे व त्याच्या बँक खात्यातुन इतर काही बँख खात्यात ती रक्कम गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ती बँक खाती कोनाची याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी संतोष चव्हाणला देखिल पोलीसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर पर्यंतची कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र गलाडें यांनी सांगितले.

Web Title: Yadav's police custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.