यादवला ३ दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Updated: April 25, 2017 01:59 IST2017-04-25T01:59:49+5:302017-04-25T01:59:49+5:30
खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. अनिल यादव याला वसई न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दली आहे.

यादवला ३ दिवसांची पोलीस कोठडी
वसई : खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. अनिल यादव याला वसई न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दली आहे. यावेळी तपास अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून आपल्याकडून तपास काढून घेतल्याचा खळबळजनक पुरावा कोर्टापुढे सादर केला.
माहिती अधिकाराचा गैरवापर करून बिल्डरांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी डॉ. अनिल यादवविरोधात वसई, नालासोपारा आणि वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाझीयाबाद येथून अटक केली होती. पोलिसांनी आज दुपारी यादवला न्यायालयापुढे हजर करून पाच दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती. यावेळी यादवकडून गु्न्ह्यात वापरलेले पिस्तुल हस्तगत करण्यासोबत इतर तपास करायचा असल्याने पाच दिवसांची कोठडी मिळावी असा अर्ज न्यायालयापुढे सादर केला होता. कोर्टाने यादवला पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)