बनावट सहीप्रकरणी रासपच्या उमेदवारावर गुन्हा
By Admin | Updated: October 30, 2014 01:46 IST2014-10-30T01:46:31+5:302014-10-30T01:46:31+5:30
संयुक्त खात्यातील 5.70 कोटी रुपये परस्पर काढल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह राजकुमार भोसले, आयसीआयसीआयचे कर्मचारी मंगेश राऊत, अजय जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बनावट सहीप्रकरणी रासपच्या उमेदवारावर गुन्हा
सातारा : धनादेशावर खोटी सही करून संयुक्त खात्यातील 5.70 कोटी रुपये परस्पर काढल्याप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह राजकुमार भोसले, आयसीआयसीआयचे कर्मचारी मंगेश राऊत, अजय जैन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शेखर गोरे हे माण मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
याप्रकरणी शेखर गोरे यांचे भाऊ अंकुश यांचे स्वीय सहायक महेश बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, अंकुश आणि शेखर गोरे यांची कमल एंटरप्रायजेस कंपनी असून तिचे आयसीआयसीआय बँकेच्या दहिवडी शाखेत संयुक्त खाते आहे. या खात्यातील 5 कोटी 70 लाखांची रक्कम शेखर यांनी कंपनीतील कर्मचारी राजकुमार भोसले यांच्या सहकार्याने अंकुश यांची बनावट सही करून परस्पर काढले आहेत. हा ‘अॅट पार’ धनादेश आयसीआयसीआय बँकेच्या पुणो येथील फडके हौद शाखेतील कर्मचारी अजय जैन या कर्मचा:याच्या मदतीने वटवून घेतला आणि ही रक्कम स्वत:च्या आदित्य कन्स्ट्रक्शनच्या नावे जमा करून घेतली. ही रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या कोथरुड शाखेतील आदित्य कन्स्ट्रक्शनच्या खात्यात जमा झाल्याचे उघड झाले.