१३ लाख खर्च करून छापले सर्व शिक्षा अभियानातील चुकीचे बॅनर!
By Admin | Updated: June 19, 2014 21:57 IST2014-06-19T21:38:44+5:302014-06-19T21:57:40+5:30
छापून घेतलेले बॅनरवर चुकीची माहिती आहे.

१३ लाख खर्च करून छापले सर्व शिक्षा अभियानातील चुकीचे बॅनर!
अकोला- जिल्हा परिषद अकोला यांच्या अंतर्गत येणार्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे १३ लाख रुपये खर्च करून शैक्षणिक मार्गदर्शनासाठी छापून घेतलेले बॅनरवर चुकीची माहिती आहे.
अशा चुकीच्या बॅनरद्वारे विद्यार्थ्यांपर्यंंत माहिती पोहोचविणार्यांवर आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी स्थायी समिती सभेत बुधवारी गेली. स्थायी समितीची सभा दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत पाणीपुरवठय़ासह शिक्षण विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. पांडे गुरुजी यांनी चुकीची माहिती असलेले बॅनर सभागृहात दाखवून अधिकार्यांना जाब विचारला. याशिवाय नियमबाह्य बदल्या आणि उर्दू शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीबाबत चौकशी समिती गठित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विजय लव्हाळे यांनी हातरूण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्माणधिन इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने काम करून घेतले जाईल, असे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियत्यांनी सांगितले. या सभेला अध्यक्ष शरद गवई यांच्यासह सभापती आणि सर्व सदस्य उपस्थित होते.