महाराष्ट्रातल्या २७ कवींनी लिहिली देशभक्तीपर गीते!
By Admin | Updated: August 3, 2016 02:17 IST2016-08-03T02:17:59+5:302016-08-03T02:17:59+5:30
महाराष्ट्रातील २७ कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात पार पडणार आहे.

महाराष्ट्रातल्या २७ कवींनी लिहिली देशभक्तीपर गीते!
मुंबई : महाराष्ट्रातील २७ कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात पार पडणार आहे.
राजभवनात ५आॅगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजता होत असून या संग्रहात १०० देशभक्तीपर गीते आहेत. याचे प्रमुख संपादन डॉ. विजया वाड यांनी केले असून प्रियंवदा करंडे सहाय्यक संपादक आहेत.
देशभक्ती मुलांच्या मनात रुजावी, त्यांनी देशाची गाणी गात मोठे व्हावे, सच्चे देशभक्त व्हावे या इच्छेने प्रेरित होऊन या गीतांचे लेखन सर्व कवींनी केले आहे.
भारतीय लष्करात १९६५ चे युद्ध लढलेल्या आणि रक्षा मेडल मिळविलेल्या कॅप्टन डॉ. विजयकुमार वाड आणि देशासाठी हजारो सेनाधिकारी तयार करणारे कॅप्टन सुरेश वंजारी यांचा सत्कार या कार्यक्रमात होईल व २ गीते बालके सादर करतील. (प्रतिनिधी)