इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहावे - राज्यपाल

By Admin | Updated: July 6, 2014 00:11 IST2014-07-06T00:11:02+5:302014-07-06T00:11:02+5:30

इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले.

Writing historians should be loyal to the truth - the governor | इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहावे - राज्यपाल

इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहावे - राज्यपाल

मुंबई : इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. ‘स्थानपोथी : एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या चक्रधर स्वामींच्या 
स्थानपोथीवर आधारित ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या 8क्क् व्या जयंतीनिमित्ताने हा ग्रंथ प्रकाशित केला. मंडळाचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक डॉ. अरविंद जामसंडेकर, मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य 
प्रशासन विभागाचे सचिव 
श्रीकांत देशपांडे या वेळी उपस्थित होते.
यादवकाळात होऊन गेलेल्या चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रातील वा्मयीन समृद्धीमध्ये मोलाची भर घातली आहे. चक्रधर स्वामींचे कार्यक्षेत्र मुख्यत्वेकरून गोदावरीचा काठ हे होते. गोदावरीच्या उभय तीरांवरून त्यांनी केलेले परिभ्रमण हे त्यांच्या स्थानपोथीच्या 
निर्मितीमागील कार्यकारण होते, 
असे मधू मंगेश कर्णिक यांनी 
सांगितले.
‘स्थानपोथी : एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या ग्रंथात लेखक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी पुरातत्त्व अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून यादवकालीन महाराष्ट्रातील मंदिरे, शाळा, तीर्थयात्रेची ठिकाणो, किल्ले, घरे व शहरे यावरील विवेचनातून तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय व भौतिक जीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Writing historians should be loyal to the truth - the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.