शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरे यांच्याकडून दिब्रेटो यांच्या मताचे खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 17:50 IST

फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जेएनयूमधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं मत व्यक्त केले होते.

९३ वे अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं होतं. यावर मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी विरोधी मत व्यक्त केले आहे. 

फ्रान्सिस दिब्रेटो यांनी जेएनयूमधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं मत व्यक्त केले होते. यावर देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,' असं मत अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी मांडले. तसेच साहित्यिकांवर कोणताही दबाव नसल्याचे देखील अरुणा ढेरे यांनी एका वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं असा सवाल फ्रान्सिस दिब्रेटो यांनी उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर यांना ठार करण्यात येतं ही कोणती भारतीय संस्कृती असल्याचे सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही फ्रान्सिस दिब्रेटो यांनी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी