शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वाह, क्या बात है ! ज्येष्ठ नागरिकांची पुणे ते कन्याकुमारी सायकल वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 12:45 IST

हे आठही सदस्य सेवानिवृत्त आहेत. सर्वाचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे.

पिंपरी : पुणे ते कन्याकुमारी हे अंतर जवळपास १५९० किलोमीटर आहे. रेल्वेने किंवा बसने हे अंतर पार करायचे म्हटले, तरी थकवा येतो. पुण्यातील यंग सिनियर ग्रुपच्या आठ सदस्यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकलने वारी काढली. अविनाश मेंढेकर, ( ६३) अनिल पिंपळीकर ( ७०) दत्ता गोखले ( ६३) संजय जोशी ( ६२) पद्यामकर आगाशे ( ६८) मिलिंद संधाने ( ६३) प्रकाश टेंमभेकर( ६१) प्रदीप भालवडकर ( ६५) ही आठ मंडळी प्रवास करीत आहेत.हे आठही सदस्य सेवानिवृत्त आहेत. सर्वाचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. पुण्यातून ५ जानेवारीला त्यांनी प्रवास सुरू केला. अर्धापेक्षा जास्त अंतर त्यांनी पार केले असून, १८ जानेवारीला कन्याकुमारीला पोहचणार आहेत.

रोज १२५ ते १३० किलोमीटरचा प्रवास ते करत आहेत. प्रवास करताना त्यांना अनेक नागरिक भेट असून, या वयात सायकलने प्रवास करत असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.इच्छा शक्ती असेल तर वय आडवे येत नाही हे या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले आहे. या ग्रुप मधील सदस्य हे नियमीतपणे सायकलने विविध ठिकाणी प्रवास करीत असतात. शनिवारी आणि रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एखादे ठिकाण ठरवून त्या ठिकाणी सायकलने ही मंडळी नियमीतपणे जात असतात. त्याचबरोबर कार्तिकी एकादशीला पुणे ते पंढरपूर प्रवास ते करीत असतात.कोरोनामुळे मगील वर्षी प्रवास करण्याला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे मागील वर्षी त्यांनी प्रवास केला नाही. परंतु आता ॲनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही मंडळीनी पुन्हा प्रवास सुरू केला आहे. कोरोनामुळे सर्वाना आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे, हे समजले आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सायकल चालविणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही मंड‌ळी आवडीबरोबरच सायकल चालविणे किती फायद्याचे आहे, हे सांगत आहेत.

--

२०१७ मध्ये पहिल्यांदा पुणे ते कन्याकुमारी सायकलने प्रवास केला. मागील महिन्यापर्यंत सायकलने २७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत राजस्थान, गुजरात, दिल्ली असा सायकलने प्रवास केला आहे. माझा जावई सायकल विकत घेत होता. तेव्हा मला जावयाकडून सायकल चालविण्याची प्रेरणा मिळाली. पुणे ते कन्याकुमारी हे अंतर १४ दिवसात पार करणार आहोत.

अनिल पिंपळीकर, यंग सिनियर गुप, सदस्य

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCyclingसायकलिंग