वाल्हेत चारा छावणीची मागणी

By Admin | Updated: April 30, 2016 00:57 IST2016-04-30T00:57:37+5:302016-04-30T00:57:37+5:30

वाल्हे परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी संकट व जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा, याला तोंड द्यावे लागत आहे.

Worth bait camps demand | वाल्हेत चारा छावणीची मागणी

वाल्हेत चारा छावणीची मागणी

वाल्हे : वाल्हे परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी संकट व जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा,
याला तोंड द्यावे लागत आहे.
वाड्या-वस्तीला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. आणखी टँकरचे प्रस्ताव ग्रामस्थांनी दिले आहे. यामुळे वाल्ह्यात चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी
ग्रामपंचयात कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.
चारा छावण्या व चारा डेपो याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपातळीवर कर्मचारी, वनाधिकारी यांची समिती गठित करून त्वरित तपशील मागितला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासाठी शुक्रवारी वाल्हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी लावून धरली. छावणीमुळे एकाच जागेवरती पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था होईल, नाही तर चारा डेपो तरी वेळ न लावता
चालू करावा, अशी मागणी केली. या समितीमध्ये अध्यक्ष मंडल
अधिकारी व्ही. बी. गायकवाड, तलाठी आर. ए.भामे , ग्रामसेवक ए. बी. भोसले, कृषी सहायक शिवाजी सरडे व डांबेसाहेब, पशुधन पर्यवेक्षक सोनवने, सरपंच कल्पना गोळे या समितीने छावणीसाठी जागा, जनावरांना करावा लागणारा पाणीपुरवठा, छावणीचे व्यवस्थापन स्वयंस्फूर्तीने करणाऱ्या संस्थांची नावे, छावणीसाठी एक महिना पुरेल एवढा चारा, याबाबत चर्चा केली. याबाबतचा अहवाल २ दिवसांत शासन दरबारी देऊ, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
या वेळी उपसरपंच पोपटनाना पवार, पुरंदर तालुका संजय गांधी निराधारचे अध्यक्ष गिरीशनाना
पवार, ग्रामपंचायत सदस्य
सूर्यकांत पवार, बाळासाहेब भुजबळ, दादा मदने, माजी सरपंच महादेव चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, रवींद्र भोसले, सचिन पवार, दिलीप हवलदार, सचिन देशपांडे, नवनाथ पवार, हनुमंत पवार, पोपट दुगार्डे, तुषार भुजबळ दत्तात्रेय पवार, आनंद पवार, अरविंद पवार आदी मान्यवरांनी चर्चेत भाग घेतला. उपसरपंच पोपटनाना यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पवार यांनी आभार मानले.

Web Title: Worth bait camps demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.