शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चिंताजनक! चार वर्षांत १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:45 IST

राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची प्रकरणे निदर्शनाला आली

मुंबई : राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची प्रकरणे निदर्शनाला आली. यातली ६८८८ प्रकरणे जिल्हास्तरीय समित्यांमध्ये पात्र ठरली असून त्यातल्या ६८४५ प्रकरणात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना एक लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी एका लेखी उत्तरात सांगितले.केंद्र सरकारच्या कीडबाधित क्षेत्र अहवालात महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी एका लेखी उत्तरात दिली. महाराष्ट्रात ऊस, मका व ज्वारी कीडींची बाधा झाली आहे. मक्यावरील नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याचेहीत्यांनी सांगितले. धनंजय मुंडे, अनिल तटकरे आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.कोकणात मत्स्य विज्ञान विद्यापीठ नाहीकोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न विलास पोतनीस, रवींद्र फाटक आदींनी विचारला होता. मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्याला उत्तर दिले. दापोली तालुक्यातल्या शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न करण्याचा निर्णय झाला आहे. कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करावयाचे झाल्यास डॉ. मुणगेकर समितीच्या अहवालानुसार शंभर एकर जागा, २१५ कोटींचा आवर्ती तर २९५ कोटींचा अनावर्ती खर्च येईल. या पार्श्वभूमीवर कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते आपल्या लेखी उत्तरात म्हणाले.कोतवालांचा कोटा वाढवलाराज्यातल्या कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सतेज पाटील, शरद रणपिसे आदींनी उपस्थित केला होता. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याला उत्तर दिले. कोतवालांच्या कामाचे एकत्रित स्वरूप पाहता त्यांना विविध योजनांचा लाभ देणे, चतुर्थश्रेणीच्या सरळसेवेच्या पदांमध्ये शिपाई म्हणून प्रथम नियुक्तीचा कोटा २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी