पर्यटन प्रसारासाठी जगभरातील टीम सिंधुदुर्गात

By Admin | Updated: October 1, 2015 00:38 IST2015-10-01T00:22:43+5:302015-10-01T00:38:01+5:30

राज्य शासनाचा पुढाकार : ‘महाराष्ट्र पर्यटन’ने टूर आॅपरेटर प्रतिनिधींना केले आमंत्रित

Worldwide team for tourism promotion in Sindhudurg | पर्यटन प्रसारासाठी जगभरातील टीम सिंधुदुर्गात

पर्यटन प्रसारासाठी जगभरातील टीम सिंधुदुर्गात

मालवण : कोकणचे पर्यटन जगभरातील पर्यटकांना भुलवते. लाखो देशी-विदेशी पर्यटक पर्यटनासाठी ंकोकणला पसंती देत आहेत. काही वर्षांपासून वाढत जाणाऱ्या या पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार अधिक गतिमानपणे विदेशातही व्हावा या
हेतूने महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्यावतीने २५ देशांतील २७ जणांची एक टीम कोकणच्या पर्यटनाची माहिती घेऊन जगभरात प्रसार करणार आहे. दरम्यान, विदेशातील या टीमने सिंधुदुर्गातील निसर्ग आणि पर्यटन पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. मात्र, त्याच्या जोडीला येथे पायाभूत सुविधा आणि दर्जेदार रस्ते निर्माण झाल्यास कोकणचे पर्यटन जगात अव्वल असेल, असा विश्वास पर्यटन प्रतिनिधींनी व्यक्त केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन जगभरात पोहोचावे आणि या भागात विदेशी पर्यटक येऊन या भागाचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जगभरातील टूर आॅपरेटर कंपनींच्या प्रतिनिधींची टूर आयोजित केली आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य पर्यटनावर खूश झालेल्या या टूर आॅपरेटर प्रतिनिधिंनी पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्रत्येक विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आॅस्ट्रेलिया, रशिया, जर्मनी, पोलंड, साऊथ आफ्रिका, लोकावाकीया या प्रमुख देशांसह २५ देशांतील पर्यटन प्रतिनिधींची
टूर आयोजित के होती. यात तारकर्ली, देवबाग, विजयदुर्ग या पर्यटनस्थळांना प्रतिनिधींनी भेट दिली. तारकर्ली येथील एमटीडीसी येथे या विदेशी पर्यटकांचे स्वागत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी केले. स्थानिक महिलांनी पर्यटकांचे पंचारती ओवाळून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. (प्रतिनिधी)



स्कुबा डायव्हिंग स्नॉर्कलिंगचा लुटला आनंद
विदेशी पर्यटकांनी देवबाग येथील वॉटर स्पोर्ट्सचे कौतुक केले, तर तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरलाही त्यांनी भेट दिली. अशा पर्यटन प्रकल्पानंतर सिंधुदुर्ग पर्यटनात नवी उभारी घेईल. येथे पायाभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्यास पर्यटनात निश्चितच वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Worldwide team for tourism promotion in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.