जगातील पहिली उंच इमारत औरंगाबादेत!

By Admin | Updated: July 13, 2014 01:44 IST2014-07-13T01:44:09+5:302014-07-13T01:44:09+5:30

जगातील पहिली आठ मजली उंच इमारत 1849 मध्ये शिकागोमध्ये उभारण्यात आली, अशी इतिहासात नोंद आहे.

The world's tallest building Aurangabad! | जगातील पहिली उंच इमारत औरंगाबादेत!

जगातील पहिली उंच इमारत औरंगाबादेत!

प्रशांत तेलवाडकर - औरंगाबाद
जगातील पहिली आठ मजली उंच इमारत 1849 मध्ये शिकागोमध्ये उभारण्यात आली, अशी इतिहासात नोंद आहे. मात्र, त्याआधीही 17 व्या शतकात महाराष्ट्रातील औरंगाबादेत 7 व 9 मजली इमारती बांधण्यात आल्या होत्या, असा पुरावा इतिहास संशोधक डॉ. शेख रमजान यांच्या हाती लागला आहे. 
 इतिहासात अशी नोंद आहे की, 1849 साली विल्यम जॉन्स्टन याने शिकागो येथे सर्वात मोठी (8 मजली) इमारत उभारली. नंतर 36 वर्षानी शिकागो येथेच विल्यम ले बॅरग जेनी याने ‘लाइफ इन्शुअरन्स कंपनी’साठी 1क् मजली इमारत बांधली. मात्र, त्याअगोदर म्हणजे जवळपास 1क्क् वर्षे आधीच औरंगाबादेत बहुमजली मजली इमारती उभारण्यात आल्या होत्या. भारतातील स्थापत्यशास्त्र तेव्हा एवढे प्रगत होते, हे सत्य संशोधनातून समोर आले आहे. 
यासंदर्भात शेख रमजान म्हणाले की, माङया हाती आलेल्या शेकडो अस्सल सनदा, खरेदीपत्रे, विक्रीपत्रंचा अभ्यास केल्यावर मला असे दिसले की, आजमगंज मोहल्ला (सध्याच्या मिल कॉर्नरजवळ), मोगलपुरा, तसेच मेहमूदपुरा (हिमायतबाग ते हसरूल रोड) या परिसरात त्याकाळी उंच इमारती होत्या. या परिसरात तेव्हा श्रीमंतांची वसाहत होती. 4 ते 7 मजल्यांर्पयत इमारती होत्या. यात बेगमपु:यात त्या काळी 9 मजली इमारती बांधण्यात आल्या होत्या. मेहमूदपु:यात हिरे-जवाहिराचा मोठा व्यापार होता. त्या काळचा तो ‘जव्हेरी बाजार’च होता. सिडकोच्या वसाहतीमुळे तेथील घरे, बागा नष्ट झाल्या. शहरातील जुन्या घरांपैकी काहींचे क्षेत्रफळ 5क्क् यार्ड ते 7 हजार चौरस यार्ड असल्याचे खरेदी-विक्रीपत्रतील मजकुरावरून लक्षात येते. 
इतिहासातील उल्लेख
औरंगाबाद हे शहर निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने 1617 साली वसवले. उंच इमारती बांधण्याचा वारसा त्याच्यापासून औरंगाबादला मिळाला. याचा वारसा तत्कालीन इतिहासात नमूद आहे. 
शाहजादा शाहजहांबरोबर मिर्जा सादिक आसफहानी नावाचा सेनानी जुन्नर येथे होता. तो औरंगाबादेत (तेव्हाचे खडकी) आला. त्यावेळी त्याने या शहराचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, हे शहर मलिक अंबरने वसविले आहे. 
येथील इमारती इतक्या उंच आहेत की, त्या आकाशाला 
भिडल्या आहेत, असा भास 
होतो. जहांगीर बादशहानेही हे 
शहर अत्यंत सुंदर असून ते 
वसवण्यास मलिक अंबरला 2क् वर्षे लागली, अशी नोंद आत्मचरित्रत केली आहे.
 
नऊ मजली
1727 मध्ये अब्दुल वाहीदबीन सआदतमंद व बबकाबिबी सआदतमंद यांनी बेगमपु:यातील 9 मजली इमारत तुर्कताज खान बहादूरबीन एक्काताज खानबीन शहा मोहंमद अवगलान यांना विकली. खरेदीदाराचे वकील हाजी मोहंमद अली खान हे होते.  
(सर्व खरेदी-विक्रीपत्रे पारशी भाषेत असून त्यांचे हिंदीत भाषांतर मौलाना इजीलाल अहेमद यांनी केले.) 
 
1ख्वाजा अब्दुल गणी यांची मुलगी खानमजान हिने आपली मुगलपु:यातील चार मजली इमारत भेट दिली. मुहर काजी शेख उल इस्लाम, वकील मीर ख्वाजा अब्दुल. 
2ख्वाजा अब्दुल खलीफ याची मुलगी खासाबिबी हिने आपली आजमगंज येथील चार मजली इमारत विकली. मुहर आसिक जाही निजाम उलू मुस्क. इ.स. 1744. 
 
3पैगंबरवासी तुर्कताज खाँं याची विधवा पलियाखानम हिने आपल्या मालकीचे मेहमूदपुरा येथील चार मजली दुकान विकले. त्यात 42 खोल्या होत्या. (इ.स. 1741).
4अब्दुल खलीमची मुलगी व खाजावलीची विधवा साहेबाबिबी हिने आपली आजमगंज येथील 4 मजली इमारत 173क् साली विकली. 
 
सुरबाजीचा नातू व बायाजीचा मुलगा राणुजी याने अब्दुल्ला खानचा नातू बर्कअंदाज खाँ याला 1719 मध्ये बेगमपुरातील ही सात मजली इमारत विकली. 

 

Web Title: The world's tallest building Aurangabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.