शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!

By admin | Updated: May 16, 2016 05:10 IST

फुलाचे ४ प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाट व जीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत.

अशोक खरात,

खोडद (जि. पुणे)- आपल्या आजूबाजूला गुलाब, मोगरा, जाईजुई अशी किती तरी सुंदर फुलं आहेत. पण आॅर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलाचा मान मिळालेला आहे. या फुलाचे ४ प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाट व जीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत. आॅर्किड्सची फुलांची मोठी गंमत म्हणजे ही फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. ही फुले एवढी मनमोहक असतात की, कोणीही सहज आकर्षित होतं.खोडद (ता. जुन्नर) येथील वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले की काही आॅर्किड्स काही मीटरपर्यंत वाढतात. याउलट वृक्षांच्या खोडात वाढणारी आॅर्किड्स दरवर्षी नवीन जन्म घेतात. एकदा वाढलेली फांदी प्रजननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळून पडते. नवीन वर्षी नव्या फांद्या फुटतात. यामध्येदेखील मुळांच्या रूपानं आॅर्किड निसर्गात मुक्त श्वास घेत असतं. झाडांच्या खोडांत वाढणारी आॅर्किड्स ही बहुधा या प्रकारातील असतात, म्हणजेच ते कुठल्या तरी वृक्षांच्या फांद्यांवर किंवा खोडांत वाढतात. पण अन्नद्रव्यांसाठी ते त्यावर अवलंबून नसतात. फुलाची दांडी ही १८० कोनामध्ये वळलेली असते. अर्थात हे आपण वरवर पाहताना लक्षात येत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे आॅर्किडच्या बिया अतिशय सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे नुसत्या डोळ्यांनी न दिसण्याइतक्या सूक्ष्म असतात. त्यासाठी सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो, असेही डोंगरे यांनी सांगितले.>एकट्या आॅर्किड या कुळामध्ये ८८० जाती आणि २७,८०० प्रजातींचा समावेश आहे. याशिवाय नवीन प्रजातींवर जगभर संशोधन सुरू आहे. आॅर्किड्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. जमिनीवर वाढणारे आणि वृक्षांच्या खोडांमध्ये किंवा फांद्यांवर वाढणारे. यातील जमिनीवर वाढणाऱ्या आॅर्किड्समध्ये मुळांची जागा छोट्या बटाट्यासारख्या मुळाने घेतलेली असते. या बटाट्यांमधून पुढे वेगवेगळे कोंब फुटतात आणि वाढतात. नवीन कोंबावर फुले लागतात. पुढे परिपक्व होऊन फळे आणि बीजप्रसार होतो. हे चक्र पूर्ण झालं, की हाच जुना कोंब पुढे वाढून नव्याने पुन्हा तेच चक्र सुरू होतं.- राजकुमार डोंगरे, वनस्पती अभ्यासक