पॉर्न बघण्यात जगभरात पुणे, मुंबई पहिल्या तिघात
By Admin | Updated: October 8, 2015 16:26 IST2015-10-08T16:26:12+5:302015-10-08T16:26:12+5:30
गुगलवर पॉर्न सर्च करणा-या जगातील टॉप १० शहरांपैकी सहा शहरं ही भारतातील आहे. विशेष म्हणजे गुगलवर पॉर्न सर्च करणा-यांमध्ये दिल्ली पहिल्या, पुणे दुस-या आणि मुंबई तिस-या स्थानावर आहे.

पॉर्न बघण्यात जगभरात पुणे, मुंबई पहिल्या तिघात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - गुगलवर पॉर्न सर्च करणा-या जगातील टॉप १० शहरांपैकी सहा शहरं ही भारतातील आहे. विशेष म्हणजे गुगलवर पॉर्न सर्च करणा-यांमध्ये दिल्ली पहिल्या, पुणे दुस-या आणि मुंबई तिस-या स्थानावर आहे.
गुगल ट्रेण्डनुसार गुगलवर पॉर्न सर्च करणा-या टॉप १० शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. या १० पैकी सहा शहरं ही भारतातील असून त्यापैकी दोन शहरं महाराष्ट्रातील आहे. पॉर्न सर्च करणा-या शहरात पहिला क्रमांक दिल्ली, त्यापाठोपाठ पुणे व मुंबईचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. यानंतर हावडा उन्नाव, क्वालालांपूर आणि बेंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो. गुगल ट्रेण्डवरुन लोकांमधील कामोत्तेजना व विकृतीही दिसून येतो. पण ऑनलाइन कृतीला प्रत्यक्ष आयुष्याशी जोडण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुगलवरील कि वर्ड्सवरुन लोकांमध्ये सेक्सविषयी असलेली उत्सुकता दिसते असे तज्ज्ञांचे मत आहे.
२००८ पर्यंत अॅनिमल पॉर्न सर्च करणा-यांमध्ये पुणे हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु या शहरांचा क्रमांक लागत होता. तर रेप पॉर्न सर्च करण्यात कोलकाता, हावडा, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे ही शहरं आघाडीवर आहेत. उत्तरप्रदेशमधील उन्नाव सारख्या लहान शहरात गुगलवर चाईल्ड सेक्स सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारी सांगते.
गुगल ट्रेण्डवमधून अचूक माहिती मिळत नसली तरी यातून लोकांचा कल दिसून येतो. चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये गुगलवर बंदी आहे. तर अमेरिका, युरोपिय महासंघ येथील इंटरनेट युजर्स वेगवेगळे सर्च इंजिन वापरत असल्याने ट्रेण्डची आकडेवारी परिणूर्ण होत नाही याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. परदेशातील युझर्स थेट पॉर्न साईटवर जातात. पण भारतातील युजर्स आधी गुगलवर पॉर्न किंवा सेक्स असा किवर्ड टाकतात व त्याखाली येणा-या लिंकवर क्लिक करतात. यावरुन आपल्या देशात इंटरनेट निरक्षरता आणि भाषेवरील प्रभुत्वाचा अभाव या गोष्टी स्पष्ट होतात असे एका सायबर तज्ज्ञाने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.