जागतिक गिधाड संवर्धन दिन

By Admin | Updated: September 5, 2016 03:06 IST2016-09-05T03:06:53+5:302016-09-05T03:06:53+5:30

फणसाड अभयारण्यामध्ये शनिवारी जागतिक गिधाड संवर्धन दिन कार्यक्र माचे आयोजन फणसाड वनपरिक्षेत्र विभागातर्फे करण्यात आले होते.

World Vulture Promotion Day | जागतिक गिधाड संवर्धन दिन

जागतिक गिधाड संवर्धन दिन


आगरदांडा : फणसाड अभयारण्यामध्ये शनिवारी जागतिक गिधाड संवर्धन दिन कार्यक्र माचे आयोजन फणसाड वनपरिक्षेत्र विभागातर्फे करण्यात आले होते. फणसाड अभयारण्य जंजिराच्या नवाबाचे संरक्षित वनक्षेत्र होते त्यामुळे येथे शेकडो वर्षे वनसंपदेचे जपवणूक झाली आहे. आता तेच वनक्षेत्र फणसाड अभयारण्य म्हणून विकसित झालेले आहे. याठिकाणी हजारो पर्यटक वर्षभर येत असतात, जीवशास्त्राचे अभ्यासक याठिकाणी त्यांच्या परीक्षणासाठी येतात. याठिकाणी गेली दहा-बारा वर्षे गिधाडांचे यशस्वी संवर्धन झालेले आहे. त्याची दखल घेऊन शासनाने या मोहिमेला अजून ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासकीय मदत देण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आय. तडवी यांनी या जागतिक गिधाड संवर्धन दिनाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर गिधाड संशोधक प्रेमसागर मेस्त्री, काशिनाथ महाडिक, संतोष महाडिक, श्रीकांत सुर्वे, रवी साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेमसागर मेस्त्री यांनी यावेळी स्लाईड शोच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना गिधाड संवर्धनाच्या मोहिमेची माहिती दिली. वनपाल आय.आर. विंचू यांनी प्रास्ताविक के ले. (वार्ताहर)

Web Title: World Vulture Promotion Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.