शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : गर्भावस्थेत टाळा '' हायपर टेन्शन ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:16 IST

मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात घर केलेले असते.

ठळक मुद्देप्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माणसुमारे ५ टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब गर्भावस्थेत प्रीएक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरीअ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी

पुणे: धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, आहारातील बदल यामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती असते. गर्भावस्थेतील हायपर टेन्शन हा बहुतांश महिलांना आजकाल सतावणारी समस्या बनू पाहत आहे. सुमारे ५ टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो. त्यातूनच प्री-एक्ल्मप्शियाची शक्यता वाढीस लागते.मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात घर केलेले असते. बरेचदा गर्भवती महिलांमध्ये हायपर टेन्शन (रक्तदाब वाढणे), हातांना आणि पायांना सूज आणि मूत्रात प्रोटीन जमा होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्री-एक्ल्मप्शिया’ असे म्हटले जाते.प्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास त्यातून माता आणि बाळासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यातून मातेमध्ये एक्ल्मप्शिया (गंभीर स्थिती) आणि ‘हेल्प’ (एचईएलएलपी-हेमोलायसिस, यकृतातील एन्झाइम्स वाढणे, प्लेटलेट्स कमी होणे) ही स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून मूत्रपिंडाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते, अशी माहिती प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी ‘लोकमत’श्ी बोलताना दिली.रक्तदाब वाढणे हे प्री-एक्ल्मप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे, हायपर टेन्शनचे वेळात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे सुरू करणे, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे मोजमाप, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे.देखभालीच्या यापैकी कोणत्याही पद्धतीतून मातेला किंवा बाळाला धोका असल्याचे निदान होत असल्यास डिलिव्हरी करावी लागते. त्यामुळेच, गर्भावस्थेत प्रीएक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरी केली जाते. प्री-एक्ल्मप्शियामागे कोणतेही एक ठोस कारण नाही. मात्र, गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पाहण्यात आले आहेत. शिवाय, बरेचदा नंतरच्या गरोदरपणाच्या तुलनेत पहिल्या गरोदरपणातच प्रीएक्ल्मेप्शियाचा त्रास होतो.---------------प्रीएक्ल्मप्शिया रोखण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी मात्रेत अ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी होते, असे निदर्शनास आले आहे. डॉपलर सोनोग्राफीसारख्या स्क्रीनिंग पद्धती आणि गरोदरपणाच्या तिस-या महिन्यात काही एन्झाइम्ससाठी रक्तचाचणी केल्यासही संबंधित महिलेला प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधता येतो. वैद्यकीय उपचारांमधील आधुनिकता हा एक मोठा लाभ आहे आणि या प्रकारच्या आजारांचे नियंत्रण आणि ते उद्भवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे, माता आणि तिच्या गभार्तील बाळाच्या जीवाला धोका ठरणा-या अशा आजारांपासून त्यांना वाचवता येईल.- डॉ. राजेश्वरी पवार, कन्सलटंट, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्य