कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

By Admin | Updated: January 5, 2016 16:32 IST2016-01-05T11:31:47+5:302016-01-05T16:32:54+5:30

चौकार-षटकारांची तूफान फटकेबाजी करत अवघ्या १६ वर्षीय प्रणव धनावडेने १००० धावा फटकावत विश्वविक्रम रचला आहे.

World record of Kannan Pranav Dhawdev, 1000 not out | कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ५ -  चौकार-षटकारांची तूफान फटकेबाजी करत अवघ्या १६ वर्षीय प्रणव धनावडेने नाबाद १००० धावा फटकावत विश्वविक्रम रचला आहे. प्रणवची ही १००० धावांची खेळी म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात कल्याणच्या के.सी. गांधी शाळेतर्फे खेळणा-या प्रणवने आर्य गुरूकूल या प्रतिस्पर्धी संघाविरोधात हा विश्वविक्रम आहे. त्याच्या या खेळीमुळे सध्या ट्विटरवरही #Pranav Dhanawade हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. प्रणवने ३२३ चेंडूंमध्ये १२४ चौकार आणि ५९ षटकार फटकावत हा विक्रम रचला असून त्याच्या खेळीनंतर के.सी.गांधी शाळेच्या संघाने १४६५ धावांवर डाव घोषित केला.  प्रणवच्या या झंझावाती खेळानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरून त्याचे अभिनंदन करत त्याला भविष्यातील अशा खेळींसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

काल सामन्याच्या पहिल्या दिवशी १९९ चेंडूत नाबाद ६५२ धावांची विश्वविक्रमी खेळी करणारा प्रणव आज किती धावांचा पल्ला गाठणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर प्रणवने कालच्याप्रमाणेच फटकेबाजी करत ९०० धावांचा पल्ला पार करून क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. उपहारानंतर त्याने १००० धावा पूर्ण करत जागतिक विक्रम रचला. या धुवाधार फलंदाजीमुळे यापूर्वी १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स याने केलेल्या ६२८ धावांचा विक्रम मोडला गेला. रिझवी स्प्रिंगफील्डच्या पृथ्वी शॉ याने २०१४ साली मुंबईतील स्पर्धेत ५४६ धावांचा विक्रम केला होता. तो विक्रमही प्रणवने मागे टाकला आहे. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत १०वीत शिकत असलेला प्रणव काल ५ तास मैदानावर तळ ठोकून होता. काल दिवसअखेर त्याच्या संघाने प्रणव तसेच आकाश सिंग (१७३) आणि सिद्धेश पाटील (नाबाद १००) यांच्या खेळीच्या जोरावर १ बाद ९५६ धावांचा एव्हरेस्ट उभारला होता तर आज संघाने ११५० धावांचा टप्पा पार केला. 
 
प्रणवच्या कोचिंगचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार - विनोद तावडे
दरम्यान, प्रणवची धुवांदार खेळी पाहून त्याच्या शिक्षणाचा व क्रिकेट कोचिंगचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली. प्रणवनं क्रिकेटमधे उत्तम कामगिरी करावी यासाठी क्रीडाखात्याकडून ही मदत केली जाणार आहे.
 
आंतरशालेय क्रिकेटमधील विश्वविक्रम
 
* प्रणव धनावडे ( के.सी. गांधी शाळा) - नाबाद १००९ धावा ( वर्ष २०१६)
 
* ए.ई.जे. कॉलिन्स - ६२८ धावा  (वर्ष १८९९)
 
* पृथ्वी शॉ (रिझवी स्प्रिंगफिल्ड ) - ५४६ धावा ( वर्ष २०१४)
 
 

 

Web Title: World record of Kannan Pranav Dhawdev, 1000 not out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.