शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हिपॅटायटिस दिवस : विषाणूजन्य आजारांबाबत अनभिज्ञता नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:20 IST

सध्या जगात सुमारे २९० दशलक्ष लोक विषाणूजन्य हिपॅटायटिस आजारासोबत जगत आहेत आणि या स्थितीबद्दल ते अनभिज्ञ आहेत.

ठळक मुद्देयंदाची थीम ‘फाइंड द मिसिंग मिलियन्स

पुणे : सध्या विषाणूजन्य आजारांनी जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. हिपॅटायटिस हाही एक  विषाणूजन्य आजार आहे. हिपॅटायटिस ए आणि बीसाठी लस उपलब्ध आहे. हिपॅटायटिस ई आणि सीसाठी ही लस विकसित होत आहे. विषाणूजन्य आजारांची चाचणी वेळेत करून घेणे आवश्यक असते. जेणेकरून लवकर उपचार किंवा अन्य प्रतिबंधात्मक पर्यायांबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात. विषाणूजन्य आजारांचे निदान उशिरा झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सद्यस्थिती पाहता विषाणूजन्य आजारांबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक हिपॅटायटिस दिनाची यावर्षीची थीम ‘फाइंड द मिसिंग मिलियन्स’ अशी आहे. 

सध्या जगात सुमारे २९० दशलक्ष लोक विषाणूजन्य हिपॅटायटिस आजारासोबत जगत आहेत आणि या स्थितीबद्दल ते अनभिज्ञ आहेत. जागतिक हिपॅटायटिस  डे दर वर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने विषाणूजन्य हिपॅटायटिसच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करणे, हा यामागील हेतू आहे. 

हेपेटोट्रॉपिक विषाणूचे दोन प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए आणि ई हा पाण्यातून होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटिस बी आणि सी हे संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा शरीरातील द्रव पदार्थाच्या संपर्काद्वारे पसरतो. हिपॅटायटिस ए हे या आजाराचे सामान्य कारण आहे, दुषित अन्न आणि पाणी सेवन केल्याने हा पसरतो. पाण्यातून पसरणाऱ्या हिपॅटायटिससाठी तो सहसा जबाबदार असतो. दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरणारा हिपॅटायटिस ईमुळे भारतात बऱ्याच प्रमाणात उद्रेक झाला आहे. गरोदरपणात तो गंभीर होऊ शकतो आणि यामुळे यकृतही निष्क्रीय होऊ शकते. ए आणि ई विषाणूमुळे झालेल्या हिपॅटायटिसवर विषाणूविरोधी उपचार असल्यामुळे त्यात काहीसा आधार मिळतो. मात्र काही गंभीर रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. हिपॅटायटिस  बी आणि सी हा दुषित रक्त आणि शरीरातील द्रव्याच्या संपर्कात आल्याने होतो. हे सायलेंट विषाणू असतात. त्यांच्यामुळे यकृताला झालेली इजा दुर्लक्षित होऊ शकते, अशी माहिती हेपेटालॉजिस्ट, गॅस्ट्रोंटेरॉलॉजिस्ट डॉ. पवन हंचनाळे यांनी दिली.

    कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी किंवा आरोग्य तपासणी करण्यापूर्वी रूग्णांच्या स्क्रीनिंग टेस्ट करताना बहुतांश बी आणि सी हिपॅटायटिसचे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णाला यकृताचा गंभीर आजार (सिरॉसिस) किंवा यकृताचा कर्करोग होतो, तेव्हा बऱ्याचदा या आजाराचे निदान होते. यकृत सिरॉसिस एकदा वाढल्यावर तो कमी करता येत नाही. कावीळ किंवा जलोदरसारखी गुंतागुंत झाल्यास यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. हिपॅटायटिस बी आणि सी मुळे होणाऱ्या यकृताच्या कर्करोगारचे निदान बरेच वेळा उशीरा किंवा गंभीर अवस्थेत होते. यावेळी फक्त यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय शिल्लक उरतो, असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे.

-------

सध्या हिपॅटायटिस बी आणि सीवरील उपचारासाठी चांगली अँटीव्हायरल औषधे उपलब्ध आहेत. ९५%  हिपॅटायटिस सी रुग्णांमधील आजार बरा होतो, तर हिपॅटायटिस बीमधील गुंतगुंत थांबवून त्याचे प्रमाण नियंत्रित करता येते. हिपॅटायटिस बीच्या सर्वच रुग्णांना उपचारांची गरज पडत नाही. त्यामुळे नियमित तपासणी आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचवता येईल. अॅक्युट लिव्हर फेल्युअर (एएलएफ) ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असून त्यात यकृत एकाएकी बिघडते. हिपॅटायटिस ए, बी आणि ईमुळे हा त्रास शकतो. त्या रुग्णांना यकृत आयसीयू युनिटमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपत्कालीन यकृत प्रत्यारोपण करावे लागते

- डॉ. पवन हंचनाळे, जठरांत्र व यकृत रोग विशेषज्ञ, ज्युपिटर हॉस्पिटल

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल