शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:04 IST

Gems and jewelry Park : रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे हे स्थान अबाधित राखत असतानाच आता परकीय गुंतवणूक देखील आणता येणार आहे. बाहेरचे उद्योग येथे आल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मुंबई : रत्न आणि आभूषण उद्योगाला चालना मिळावी यासाठी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे. रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रात मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या क्षेत्रातील मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे येथे आर्थिक उलाढाल आणि सोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.महाराष्ट्राचे हे स्थान अबाधित राखत असतानाच आता परकीय गुंतवणूक देखील आणता येणार आहे. बाहेरचे उद्योग येथे आल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन, या जेम्स अँड ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्क (आयजेपीएम) जागतिक पातळीवर उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले.या पार्कच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत या पार्कबाबत रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे (जीजेईपीसी) अध्यक्ष कॉलीन शाह यांनी सादरीकरण केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष कॉलीन शाह, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साली, परिषदेचे उपाध्यक्ष विपुल शाह, सदस्य रसेल मेहता, व्यवस्थापकीय संचालक एस. रे यांचीही उपस्थिती हाेती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbusinessव्यवसायUddhav Thackerayउद्धव ठाकरे