शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

कोल्हापुरात कामगार आयुक्तालयावर हल्ला

By admin | Updated: July 5, 2016 01:43 IST

बांधकाम कामगारांची सेवापुस्तके देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’च्या आठवले गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी शाहूपुरी व्यापारी पेठ येथील सहाय्यक

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची सेवापुस्तके देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ ‘आरपीआय’च्या आठवले गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी शाहूपुरी व्यापारी पेठ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात घुसून साहित्याची तोडफोड केली. यावेळी दोघा कार्यकर्त्यांनी हातामध्ये फावडे व कुदळ घेत कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या अंगावर धाऊन जात धक्काबुक्की केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी भीतीने सैरावैरा बाहेर पळत सुटले. सुमारे अर्ध्या तासांत कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कामगार आयुक्तांच्या केबीनसह कागदपत्रांच्या फायली, लॅपटॉप, स्कॅनर, मॉनिटर, फॅक्स मशीन, लाकडी फर्निचर, टेबल, फॅन, काच, नामफलक, खुर्च्या आदी तीन लाख किमतीचे साहित्य भुईसपाट केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ‘आरपीआय’च्या २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून बारा जणांना अटक केली. संशयित आरोपी अनिल राजू जाधव (वय ३०), कुमार यल्लाप्पा इंगळे (२७), अशोक तुकाराम घोलप (२५), गुरुनाथ अशोक कांबळे (२४), आण्णा बजरंग डावाळे (३५), अरुण प्रकाश दबडे (२५), सूरज गोरख चव्हाण (२४), राजू प्रकाश कोळेकर (३०), देवदास श्रीहरी नागटिळे (२६), संतोष रामचंद्र कांबळे (२४, सर्व रा. राजेंद्रनगर), राजू दयाप्पा शिंदे (३०, रा. मोरेवाडी, ता. करवीर), भागवत सिद्ध गणेश (३०, रा. शिवाजी पेठ) अशी त्यांची नावे आहेत. ‘आरपीआय’च्या ५०० कार्यकर्त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केली होती. त्यापैकी ३७५ कामगारांनी नोंदणी अर्ज भरून एकत्रित ३२ हजार १५० रुपयांचा बँक डीडी भरला होता. यासंबंधी नोंदणी पुस्तकाचे वाटप त्वरित करून पाच हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी दि. २६ एप्रिल २०१६ रोजी कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दिले होते. यावेळी त्यांनी माहिती घेतली असता सन २०१३ पासून ३७५ बांधकाम कामगारांनी सेवापुस्तकाचे नूतनीकरण करून घेतले नसल्याचे दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांना नोंदणी अर्ज दाखल केलेल्या पोहोच पावती दाखविण्याची विनंती केली; परंतु त्या त्यांनी दाखविल्या नाही. दि. २७ जूनला पुन्हा कार्यकर्त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कामगार आयुक्तांची भेट झाली. त्यामुळे कार्यकर्ते कार्यालयातच ठिय्या मारून बसले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दोन दिवसांत कामगार आयुक्तांबरोबर बैठक करून देण्याचे आश्वासन देत कार्यकर्त्यांना माघारी घालविले. आश्वासनाप्रमाणे बैठक न झाल्याने सोमवारी सकाळी संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. (प्रतिनिधी) आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी अर्ज दाखल केलेली पोहोच नाही. तसेच सन २०१३ पासून यापैकी एकानेही सेवापुस्तकाचे नूतनीकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे ते पाच हजार रुपयांच्या अनुदानास पात्र नसतानाही ते सेवापुस्तक व अनुदानाची मागणी करत आहेत. त्यांनी केलेल्या तोडफोडीची माहिती वरिष्ठांना दिली आहे. - अनिल गुरव, सहाय्यक कामगार आयुक्त कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगारांची सेवापुस्तके गहाळ झाली आहेत. ती शोधून देण्यासाठी त्यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. त्यांच्या मागण्यांची पूर्तता वेळीच केली असती तर उद्रेक झाला नसता. - उत्तम कांबळे, जिल्हाध्यक्ष, आरपीआय, कोल्हापूर