कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू
By Admin | Updated: October 10, 2014 01:34 IST2014-10-10T01:34:37+5:302014-10-10T01:34:37+5:30
भाजपा-रिपाइं उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचार रॅली व सभेत रिपाइंचे कार्यकर्ते दिसत असून प्रचाराची धुरा रिपाइंने हाती घेतल्याचे चित्र आहे

कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू
सदानंद नाईक, उल्हासनगर
भाजपा-रिपाइं उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचार रॅली व सभेत रिपाइंचे कार्यकर्ते दिसत असून प्रचाराची धुरा रिपाइंने हाती घेतल्याचे चित्र आहे. मतदारसंघात सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी उमेदवारांनी सुरू केल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
चोपडा कोर्ट, आंबेडकर चौकातील पंकजा मुंडेंची सभा फलॉप जाऊन राखी सावंतच्या भाषणाने वाद निर्माण झाला आहे. तसेच महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत घरोबा करणाऱ्या साई पक्षाने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पाठिंबा काढल्याने कलानी गटात चिंतेचे वातावरण निर्माण आहे. पक्षाच्या माजी नगरसेविका सुरेखा वेलकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला असून काही बंडखोरांनी आयलानी यांना पाठिंबा दिला आहे.