गणेशोत्सवाची वर्गणी न देणा-या कार्यालयावर कार्यकर्त्यांचा हल्ला!
By Admin | Updated: August 29, 2016 22:09 IST2016-08-29T22:09:20+5:302016-08-29T22:09:20+5:30
‘गणेशोत्सवासाठी वर्गणी कमी घ्या,’ असे म्हटल्याच्या कारणावरून युवकांनी हल्ला करून एका ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकासह तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कार्यालयाची

गणेशोत्सवाची वर्गणी न देणा-या कार्यालयावर कार्यकर्त्यांचा हल्ला!
आॅनलाईन लोकमत
शिरवळ (सातारा), दि. 29 - ‘गणेशोत्सवासाठी वर्गणी कमी घ्या,’ असे म्हटल्याच्या कारणावरून युवकांनी हल्ला करून एका ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकासह तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी शिदेंवाडी येथील हनुमान गणेशोत्सव मंडळातील अनोळखी सहा ते सात जणांविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिदेंवाडी येथे एक ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील व्यवस्थापक राजकुमार ओमकारमल शर्मा यांच्यासह कर्मचारी सुनील शुक्ला, सोनू शर्मा, राकेश ठाकूर हे बसले असताना अनोळखी सहा ते सातजण कार्यालयात आले. यावेळी संबंंधितांनी ‘आम्ही हनुमान गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून, गणपतीच्या वर्गणीसाठी आलो आहोत. आम्हाला दीड हजार रुपयांची वर्गणी द्या,’ असे संबंंधितांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापक राजकुमार शर्मा यांनी ‘ऐवढे पैसे देणार नाही, आपण दोनशे रुपये घ्या,’ असे सांगितले. त्यावेळी संबंंधित कार्यकर्त्यांनी अचानक राजकुमार शर्मा तसेच सुनील शुक्ला, सोनू शर्मा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
यावेळी शर्मा यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या अनोळखी सहा ते सात जणांविरुद्ध शिरवळ पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार संतोष मठपती तपास करीत आहे.
खुर्ची, प्रिंटर अन् फोनचे नुकसान
त्यातील एकाने लोखंडी पाईपने मारहाण करत शिवीगाळ करीत आम्हाला ‘तुम्ही गणपतीची वर्गणी दिली नाही तर तुम्हाला हाकलून लावू,’ अशी धमकी दिली. यावेळी संबंंधितांनी कार्यालयातील खुर्ची, प्रिंटर, टेलिफोनचे तोडफोड करत सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान केले.