विपश्यनेसाठी पूर्ण वेळ काम
By Admin | Updated: November 25, 2014 00:03 IST2014-11-25T00:03:20+5:302014-11-25T00:03:20+5:30
राजकारणातून निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ विपश्यनेसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल़े

विपश्यनेसाठी पूर्ण वेळ काम
पुणो : आजवरच्या जीवनात आपण अनेक मोठमोठय़ा आव्हानांना सामोरे जाऊ शकलो, ते केवळ विपश्यनामुऴे पुढे राजकारणातून निवृत्त झाल्यावर पूर्णवेळ विपश्यनेसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितल़े
केजरीवाल यांनी आजर्पयत विपश्यनेचे 23 कोर्स पूर्ण केले आहेत़ याविषयी ते म्हणाले, ‘‘दोन महिन्यांनंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत, तरीही आपण विपश्यना कोर्ससाठी 7 दिवस वेगळे काढले, यावरूनच आपल्या जीवनात विपश्यनेला किती महत्त्व आहे, हे लक्षात येईल़’’
इन्कमटॅक्स विभागात काम करीत असताना काही सहका:यांबरोबर जयपूरला सर्वप्रथम विपश्यनेचा पहिला कोर्स केला़ त्यात मनाला शांती मिळाली़ पुढच्या जीवनात अनेक चढउतार आल़े आंदोलने झाली़ आमच्याविरुद्ध अनेक षड्यंत्रे रचली गेली़ त्याचा मोठा ताण आला़ पण, त्या वेळी आपल्याबरोबर विपश्यनेचे बळ असल्याने त्यातून मनावर नियंत्रण ठेवण्यात यश आल़े विपश्यनेमध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार सांगितला जातो़ मनाच्या विकारावर कसे नियंत्रण मिळवावे, हे यामध्ये शिकविले जाते, असे त्यांनी सांगितल़े विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ़ दत्ता कोहिनकर यांच्या तणावमुक्ती या सीडीचे प्रकाशन केजरीवाल यांच्या हस्ते झाल़े या वेळी विपश्यनाचार्य डॉ. हमीर गानला, डॉ. निखिल मेहता, यशराज पारेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)श