‘शेतकरी ग्राहक भांडार’चे काम शासनाच्या धोरणानुसारच
By Admin | Updated: December 23, 2014 23:42 IST2014-12-23T23:42:30+5:302014-12-23T23:42:30+5:30
शेतकरी ग्राहक भांडाराचे कामकाज हे शासनाच्या ध्येयधोरणाप्रमाणे बचत गटांचे सबलीकरण करण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात

‘शेतकरी ग्राहक भांडार’चे काम शासनाच्या धोरणानुसारच
नागपूर : ‘शेतकरी ग्राहक भांडाराचे कामकाज हे शासनाच्या ध्येयधोरणाप्रमाणे बचत गटांचे सबलीकरण करण्यासाठी सिन्नर मुख्य बाजार आवारात शेतमाल विक्रीसाठी मॉल उभारून त्यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेली शेती, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांसाठी उपयेगी पडेल. अशी शेती, शेतकरी यांच्यासाठी माल विक्रीची सुविधा, शेतमालविषयक सर्वतोपरी माहिती देण्यासाठी माहिती केंद्र, पिके, त्यांची लागवड, त्यावर फवारण्याची खते व बी-बियाणांची माहिती यासाठी व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादीचे आयोजन करण्यासाठीची व्यवस्था, समितीचे कार्यालय, शेतकरी निवास, हमाल, मापारी निवारी इत्यादी सोयीसुविधांनी युक्त अशा इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे समितीच्या सर्वच घटकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी यासंबंधात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सदर बांधकामास ज्या जागेवर चालू आहे ती जमीन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबर १९६१ च्या आदेशानुसार बाजार समितीस दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसारच इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ग्राहक भांडार नावानेच मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या जागेवर पूर्वी कोणतीही झाडे नसल्याने ती तोडण्याचा प्रश्न येत नाही.
शेतकरी ग्राहक भांडाराचे कामकाज ज्या जागेवर चालू आहे त्या जागेच्या समोरून खरेदी-विक्री संघाकडे जाणारा बाजार आवारातील काही पक्का व काही कच्चा रस्ता पूर्वीप्रमाणेच आहे. त्याचे कोणत्याही प्रकारचे गंभीर नुकसान झालेले नाही. रस्ता अजूनही चालू स्थितीत आहे. शेतकरी ग्राहक भांडाराचे काम जेथे चालू आहे, त्याच्या शेजारून सिमेंटच्या रस्त्यावर बांधकामाच्या अनुषंगाने काही प्रमाणात पत्र्यांची तात्पुरती स्वरुपात संरक्षण शेड उभारले असल्याने जाण्या-येण्यासाठी काही अडथळा निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)