विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पात्रतेचे काम सुरू होणार

By Admin | Updated: May 14, 2015 02:31 IST2015-05-14T02:31:04+5:302015-05-14T02:31:04+5:30

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम आता हाती घेण्यात येणार आहे.

Work on eligibility for the huts in the airport will be started | विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पात्रतेचे काम सुरू होणार

विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पात्रतेचे काम सुरू होणार

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळालगत वसलेल्या झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम आता हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर जिल्हाधिकारी (सक्षम प्राधिकारी) हे १८ मे पासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील म्हणजे जरिमरी, संदेश नगर, क्रांती नगर आणि सेवक नगरमधील झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचे काम सुरु करणार आहेत. हे काम करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबधित रहिवाशांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करावेत, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन शासनातर्फे कुर्ला प्रिमिअर आॅटोमोबाईल परिसरात करण्याचे प्रस्तावित असल्याची माहितीही प्राधिकरण्याच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Work on eligibility for the huts in the airport will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.