देशातच कार्यरत व्हा!
By Admin | Updated: August 29, 2016 03:06 IST2016-08-29T03:06:53+5:302016-08-29T03:06:53+5:30
मेक इन इंडिया चांगला उपक्रम आहे. पण वाढता ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी मेक इन इंडियासोबत मेक युवर करियर इन इंडिया अर्थात आपल्या देशातच कार्यरत व्हा.

देशातच कार्यरत व्हा!
निगडी : मेक इन इंडिया चांगला उपक्रम आहे. पण वाढता ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी मेक इन इंडियासोबत मेक युवर करियर इन इंडिया अर्थात आपल्या देशातच कार्यरत व्हा. त्यानेच देश घडेल, असे मत उद्योजक प्रमोद चौधरी यांनी दिला.
ज्ञानप्रबोधिनी नवनगर
विद्यालय स्नातक संघाने आयोजित केलेल्या प्रबोधरत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, संचालक डॉ. गिरीश बापट, आशिष शाळू, अजय लोखंडे, अॅड. प्रतिभा जोशी-दलाल, निरंजन भाटे, प्रशांत कोंडे, शशांक म्हसवडे, शिवराज पिंपुडे आदी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, ‘‘शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या चारित्र्यघडणीबरोबर त्यांच्यात उद्योजकतादेखील जोपासली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर कामे करणाऱ्या माणसांच्या नोकऱ्या घालवण्यासाठी न होता रोजगारनिर्मितीसाठी करायला शिकवला पाहिजे. अपयशाला न घाबरता, जोखीम घेण्याची मनोवृत्ती तरुणांमध्ये निर्माण करायला हवी. केवळ चार भिंतींमधले पुस्तकी शिक्षण न देता, नवे प्रयोग करण्यास, नवा विचार करण्यास उद्युक्त करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. १८ ते ३५ वयोगटातील युवकांना लहान मोठी कामे कारणासाठी उपयुक्त ठरेल, असे व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे. यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा.’’
श्रीराम दांडेकर म्हणाले, ‘‘आपली या क्षेत्रात चीनशी
स्पर्धा आहे आणि आपण त्यांच्याकडून शिक्षणाची उच्च पातळी अंगीकारली पाहिजे.’’
प्रशांत आहेर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. मृणाल धोंगडे, आदित्य शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
शीतल केसकर-कापशीकर यांनी हुतात्मा कॅप्टन मंदार बोकिल यांच्यावर पोवाडा सादर केला.
उमेश पुरोहित यांनी गायलेल्या
वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)