भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या दर्शनाला महिलांची गर्दी

By Admin | Updated: January 15, 2015 04:49 IST2015-01-15T04:49:31+5:302015-01-15T04:49:31+5:30

मकर संक्रांतीच्या एक दिवसआधी भोगीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महिलांनी रुक्मिणी मातेच्या दर्शनानिमित्त सकाळी गर्दी केली होती.

Women's rush for the festival of Rukmini maternity leave | भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या दर्शनाला महिलांची गर्दी

भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या दर्शनाला महिलांची गर्दी

पंढरपूर : मकर संक्रांतीच्या एक दिवसआधी भोगीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महिलांनी रुक्मिणी मातेच्या दर्शनानिमित्त सकाळी गर्दी केली होती.
मकर संक्रांतीनिमित्त वाणा-खणाची खरेदी केल्यावर महिला रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनाला गेल्या. मंदिरात पहाटे साडेचार वाजल्यापासूनच रुक्मिणी मातेच्या भोगीचा कार्यक्रम सुरू होता. महिलांनी मंदिरातील सभा मंडपात विविध प्रकारचे खेळही मांडले होते. त्यामुळे मंदिरातील वातावरण अधिक उत्साही झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Women's rush for the festival of Rukmini maternity leave