महिला पोलीस ठाण्यात, चोरटे महिलेच्या घरात

By Admin | Updated: September 20, 2016 15:13 IST2016-09-20T15:13:17+5:302016-09-20T15:13:17+5:30

भांडणाची तक्रार देण्यासाठी एक महिला सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात गेली असता चोरांनी तिच्या घरात डल्ला मारल्याची घटना नागपूरमध्ये घडली.

In the women's police station, the house of a nasty woman | महिला पोलीस ठाण्यात, चोरटे महिलेच्या घरात

महिला पोलीस ठाण्यात, चोरटे महिलेच्या घरात

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० -  भांडणाची तक्रार देण्यासाठी एक महिला सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात बसून होती. तिकडे चोरटे तिच्या घरात शिरले आणि रोख व सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पळून गेले.  पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक तलाव पोलीस चौकीच्या मागे ही खळबळजनक घटना घडली.
उषा विलास मौदेकर (वय ३६) यांचे सोमवारी रात्री  बाजुच्या महिलेसोबत किरकोळ भांडण झाले. त्यामुळे मौदेकर रात्री ११ वाजता आपल्या दाराला कुलूप लावून पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्या. पोलिसांनी त्यांना बराच वेळ ठाण्यात तिष्ठत बसून ठेवले. पहाटे ३ वाजता त्या घरी परतल्या तेव्हा त्यांना त्यांच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्याने लोखंडी कपाटातून रोख ३० हजार आणि सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यामुळे आणि तेथे बराच वेळ पोलिसांनी बसून ठेवल्यामुळेच चोरट्यांना डाव साधण्यास मदत झाली. दरम्यान, घरफोडीची घटना उघड झाल्यानंतर मौदेकर यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहेऑनला

Web Title: In the women's police station, the house of a nasty woman