महिलांमध्ये ‘पृथ्वीबाबां’ची क्रेझ
By Admin | Updated: October 11, 2014 05:37 IST2014-10-11T05:37:56+5:302014-10-11T05:37:56+5:30
पक्षाचा नव्हे तर, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून मुख्यमंत्री ठरवा, असे सांगितल्यावर महिलांनी पहिल्या क्रमांकावर पृथ्वीराज चव्हाण

महिलांमध्ये ‘पृथ्वीबाबां’ची क्रेझ
पूजा दामले, मुंबई
पक्षाचा नव्हे तर, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून मुख्यमंत्री ठरवा, असे सांगितल्यावर महिलांनी पहिल्या क्रमांकावर पृथ्वीराज चव्हाण आणि दुस-या क्रमांकावर राज ठाकरे यांना पसंती दिल्याचे आॅनलाईन झालेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
राज्यातील ३१ ते ३५ वयोगटातील १ हजार २५७ महिला या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. व्यक्तिमत्वावरून पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिल्याचे एका डेटिंगविषयक संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर थोड्याच फरकाने राज ठाकरे व तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस यांना पसंती मिळाली आहे. राज ठाकरे व पृथ्वीराज चव्हाण यांना बोलण्याच्या पद्धतीसाठी १० पैकी सरासरी ७ गुण मिळाले आहेत. दिसण्यामध्ये राज ठाकरेंना ९ तर पृथ्वीराज यांना ७ गुण मिळाले आहेत. व्यक्तिमत्वामध्ये राज यांना ३ तर, पृथ्वीराज यांना ६, पोषाखामध्ये राज यांना ८ तर पृथ्वीराज यांना ६, उंचीमध्ये राज यांना ४ तर पृथ्वीराज यांना ८ आणि हास्यामध्ये राज यांना ८ व पृथ्वीराज यांना ७ गुण मिळाले आहेत. याची सरासरी काढल्यास राज यांना ६.५ तर पृथ्वीराज यांना ६.८ गुण मिळाले आहेत. व्यक्तिमत्व व उंची यामध्ये फडणवीसांना ९ गुण मिळाले आहेत. हास्यामध्ये ७ व दिसण्यात ५ गुण मिळवून त्यांची सरासरी ६.३ आली आहे. चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे उद्धव ठाकरे व अजित पवार आहेत. व्यक्तिमत्वासाठी उद्धव यांना ८ तर अजित पवार यांना ५ गुण मिळाले आहेत. बोलण्याची पद्धत व पोषाखासाठी उद्धव यांना प्रत्येकी ६ तर अजित यांना प्रत्येकी ५ गुण आहेत. उद्धव यांना सरासरी ५.७ तर पवार यांना ५.५ गुण मिळाले आहेत.