फेसबूक अकाउंटवरून महिलांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 00:02 IST2016-07-13T00:02:08+5:302016-07-13T00:02:08+5:30

सधन परिवारातील सदस्यांच्या नावाने फेक फेसबूक अकाउंट तयार करून त्या परिवारातील महिला सदस्यांची बदनामी केली जात असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे

Women's Defamation on Facebook Account | फेसबूक अकाउंटवरून महिलांची बदनामी

फेसबूक अकाउंटवरून महिलांची बदनामी


ऑनलाइन लोकमत
 नागपूर, दि. १३ : सधन परिवारातील सदस्यांच्या नावाने फेक फेसबूक अकाउंट तयार करून  त्या परिवारातील महिला सदस्यांची बदनामी केली जात असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा कसोशिने शोध घेतला जात आहे. 

९०४९८८६७५०, ८४४६५१८७०६ आणि ७७७५९२८३५४ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने २७ मे रोजी फेसबूक अकाउंट बनविले. त्यावर अश्लिल छायाचित्रे, मेसेज आणि कॉमेन्ट टाकून दोन महिलांचे मोबाईल नंबर दिले. त्या नंबरवर संपर्क करण्यास सांगण्यात आले. परिणामी त्या महिलांना नको ती चौकशी आणि मागणी करणारे फोन येऊ लागले. बदनामीच्या धाकाने या प्रकाराकडे प्रारंभी त्या परिवाराने दुर्लक्ष केले. मात्र, दिवसेंदिवस त्रास जास्तच वाढत असल्याने त्यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. नमूद मोबाईल धारक आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

Web Title: Women's Defamation on Facebook Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.