शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

महिला तहसीलदार अपहरण नाट्य

By admin | Updated: February 9, 2015 08:05 IST

एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली.

दापोली : एकतर्फी प्रेमातून तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार कल्पना गोडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करीत त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी प्रफुल्ल युवराज वीर (२७) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. शनिवारी घडलेल्या या प्रकरणाबाबत तहसीलदार गोडे यांनीच फिर्याद दिली आहे.शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात प्रफुल्ल युवराज वीर (मुळचा पुण्याचा) हा तहसील कार्यालयात आला आणि त्याने थेट तहसीलदार गोडे यांचे दालन गाठले. त्या ठिकाणी गोडे व प्रफुल्ल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आक्रमक होऊन प्रफुल्लने गोडे यांच्या टेबलावरील साहित्याची फेकाफेक करीत त्यांना शिवीगाळ व मारहाणही केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून तो घेऊन गेला.तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी तत्काळ ही घटना पोलिसांना कळविली. महिला तहसीलदाराचे अपहरण झाल्याचे समजताच नाकाबंदी करण्यात आली. ही गाडी पोलिसांनी वाटेतच अडविली. मात्र, त्यावेळी गोडे यांनीच आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी न करता गाडी सोडून दिली.नंतर गोडे यांनी रविवारी कोथरूड (जि. पुणे) पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा दापोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.प्रफुल्ल याच्याशी आपली ओळख होती. तो आपल्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो आपल्याला जातीवरून कायम हिणवत असे. आपण त्याच्याशी विवाह करीत नसल्याने त्याने शनिवारी कार्यालयात घुसून हा प्रकार केल्याचे गोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.अपहरण करणार्‍या पुण्यातील तरूणा विरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३६३, ३२३, ५0६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९चे कलम ३(१) (११) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) तहसीलदारांच्या केबीनमधून मोठय़ाने आवाज आला म्हणून आम्ही आत गेलो, त्यावेळी तहसीलदार कल्पना गोडे यांनी आपला हा खासगी प्रश्न असल्याचे सांगितल्याने आपण माघारी परतलो. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. - जयराज देशमुख, नायब तहसीलदार दापोली