सोलापूरच्या बसस्थानकावर महिला झाली प्रसूत, सुरक्षारक्षकांसह प्रवाशांनी केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:01 IST2017-10-04T14:56:06+5:302017-10-04T15:01:36+5:30
सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास भर बसस्थानकावर एक महिला प्रसूत झाल्याची घटना घडली़

सोलापूरच्या बसस्थानकावर महिला झाली प्रसूत, सुरक्षारक्षकांसह प्रवाशांनी केली मदत
आप्पासाहेब पाटील
सोलापूर दि ४ : सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास भर बसस्थानकावर एक महिला प्रसूत झाल्याची घटना घडली़ या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला आहे़ प्रसूतीनंतर बाळ व ती महिला सुखरूप असल्याची माहिती शासकीय रूग्णालय प्रशासनाने दिली़
कविता विनोद राठोड (वय २५) असे भर बसस्थानकावर प्रसुत झालेल्या महिलेचे नाव आहे़ ही महिला बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पुण्याहुन दुधनी गावाजवळील लमांण तांड्याकडे जाण्यासाठी सोलापूरच्या बसस्थानकावर आली होती़ बसस्थानकावर एसटी बसची वाट पाहत बसली असता तिच्या पोटात दुखत होते़ ती किंचाळत असताना शेजारीच किरकोळ साहित्य विक्री करणाºया महिला व पोलीसांच्या मदतीने तिला सुखरूप प्रसुत करण्यास मदत केली़ त्यानंतर खासगी रूग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले़ याकामी शहर पोलीसांनी मोलाची मदत केली़ याशिवाय नगरसेवक बाबा मिस्त्री व सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले यांनी विशेष सहकार्य केले़