शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या मेगा भरतीकडे महिलांची पाठ; नियम केले शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 18:59 IST

भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

मुंबई : बेरोजगारी वाढल्याच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने दिलासा दिला असून तब्बल ८,०२२ चालक, वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे.

 भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून ३ वर्षाऐवजी १ वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.

महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यानुसार २४०६ महिलांची भरती केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी अर्ज करण्याच्या तारखेस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी होणार लेखी परिक्षा होणार असून आजअखेर २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे.  परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळDiwakar Raoteदिवाकर रावते