संरक्षक दलात महिला वाढल्या
By Admin | Updated: July 24, 2015 00:55 IST2015-07-24T00:55:59+5:302015-07-24T00:55:59+5:30
इतर क्षेत्राप्रमाणेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण विभागातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

संरक्षक दलात महिला वाढल्या
वैशाली मलेवार, नवी दिल्ली
इतर क्षेत्राप्रमाणेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण विभागातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या एका अहवालानुसार २०१० ते १७ जुलै २०१५ दरम्यान वायुसेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या (एसएससी ) माध्यमाने झालेल्या भर्तीत स्त्रियांनी पुरु षांसोबत चांगली स्पर्धा केली. यावेळी ९११ पुरु ष अधिकाऱ्यांच्या तुलनेत ८५९ महिला अधिकाऱ्यांची भर्ती झाली आहे .
वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी एस. एस. बिरदी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, वायुसेनेत महिलांना युद्ध विभाग वगळता इतर सर्व विभागात प्रवेश मिळतो. विशेष म्हणजे या विभागांमध्ये गेल्या पाच वर्षात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे.
युद्धादरम्यान शत्रूपक्ष महिला अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक देत असल्याने महिलांना सशस्त्र दलात पाठविता येत नाही. मात्र इतर सगळ्या विभागात महिला अधिकारी पुरु ष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काम करतात,असेही बिरदी यांनी स्पष्ट केले. यावर्षी गेल्या ६ महिन्यात १०३ पुरु ष आणि ९९ महिलांनी कमिशन मिळवली आहे . गेल्यावर्षी १६३ महिला आणि १४० पुरु षांनी कमिशन मिळवली होती.
एक तृतीयांश भागीदारी
वायुसेनेच्या तुलनेत थल आणि नौसेनेत कमिशन मिळवणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे . उपरोक्त कालावधीत थल सेनेत २११८ पुरु ष अधिकाऱ्यांना कमिशन मिळाली या तुलनेत महिला अधिकाऱ्यांची संख्या फक्त ६८६ होती. ही संख्या पुरु ष अधिकऱ्यांच्या तुलनेत एक तृतीयांश आहे . नौसेनेत मात्र कमिशन मिळवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची संख्या एक चतुर्थांश आहे. नौसेनेत या कालावधीत १४४१ पुरु ष आणि या तुलनेत फक्त ३२३ महिला अधिकारी कमिशन मिळवू शकल्या.