शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 12:39 IST

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. 

मुंबई - राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्रीपद निश्चित झाली नाहीत. या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काहींना डच्चू मिळाला आहे. काँग्रेसकडून मंत्रीमंडळात दोन महिला नेत्यांना संधी दिली असून  शिवसेनेने महिला नेत्यांना सपशेल डावलले आहे. तर राष्ट्रवादीने अदिती तटकरे यांना संधी दिली आहे.

खुद्द काँग्रेसनेते राहुल गांधी यांनीच महिलांना पक्षात अधिक संधी देण्यात येईल हे स्पष्ट केले होते. त्याचा प्रत्येय महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्तारात येत आहे. काँग्रेसवर निष्ठा ठेवून पक्षाचं काम करणाऱ्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीत मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी पक्षातून सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून महिला नेत्या पुन्हा एकदा उपेक्षित राहिल्या आहेत. युती सरकारमध्ये देखील शिवसेनेकडून एकही महिला नेत्याला संधी देण्यात आली नव्हती. तर भाजपने दोन महिलांना मंत्रीपदाची संधी दिली होती.  

दरम्यान काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.