शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

...तरच या कायद्याचा वचक बसू शकेल; वंशाच्या दिव्यासाठी २२% महिलांचा छळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 9:25 AM

२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या.

रवींद्र राऊळ

केवळ वंशाला दिवाच हवा, या अट्टाहासापायी महिलांचा अनन्वित छळ होत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायद्यान्वये पोलिसात दाखल होणाऱ्या एकूण तक्रारींपैकी तब्बल २२ टक्के तक्रारी या वंशाला दिवा हवा म्हणून करण्यात येणाऱ्या छळासंबंधित आहेत. 

२०२० मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे : ६७२९वंशाला दिवाच हवा म्हणून छळ झालेल्या महिला : १४८०कौटुंबिक हिंसाचारात छळाची वेगवेगळी कारणे : ७३ 

२०१९ साली राज्यात एकूण ८,४३० तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यात एकूण ८,५६१ पीडिता होत्या. त्यात १,८५४ प्रकरणात मुलगा होत नसल्याने छळ केल्याचे म्हटले होते. २०१८ साली एकूण ६,८६२ प्रकरणांमध्ये पती अथवा त्याच्या नातेवाईकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यात ६,८८२ पीडिता होत्या तर त्यातील १,५०९ प्रकरणांमध्ये मुलगा होत नसल्याचे कारण होते. 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य विभागाचा अहवाल काय सांगताे?तब्बल ७८.८ टक्के महिला अत्याचार झाला हेच सांगत नाहीत, ७.८ टक्के प्रकरणांत महिला कोणतीही मदत घेत नाहीत. केवळ १८.८% प्रकरणांतच महिला संबंधित यंत्रणांकडे मदत मागतात. यामुळे समाजात घडणाऱ्या छळसत्राचे प्रमाण कित्येक पटींमध्ये

कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लावला तरच या कायद्याचा वचक बसू शकेल. - ॲड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

अशा तक्रारी संवेदनशीलपणे हाताळल्या जातात. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, त्याची दखल घेतली जाईल.- संजय पांडे, पोलीस महासंचालक

न्याय का मिळत नाही?पोलिसांकडून दिरंगाई/राजकीय दबावतक्रार दाखल करून घेण्यास विलंबदोन-दोन महिने ताटकळत ठेवणे

टॅग्स :Womenमहिला