महिला,बालकल्याण समिती प्रथम
By Admin | Updated: July 31, 2016 02:59 IST2016-07-31T02:59:19+5:302016-07-31T02:59:19+5:30
उत्कृष्ट काम केल्याबद्दल वसई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

महिला,बालकल्याण समिती प्रथम
विरार : उत्कृष्ट काम केल्याबद्दल वसई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व महाराष्ट्र महापौर परिषद व नगर परिषद महासंघ यांनी सन २०१३-१४ मध्ये महानगरपालिका व नगर परिषदांमधील ज्या महिला बालकल्याण समित्या उत्कृष्ट काम करतील, त्यांना सन २०१४-१५ या वर्षीपासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता.
यासाठी २०१३-१४ या वर्षात केलेल्या कामांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर निवड समितीने ४ बैठका घेऊन पुरस्कार पात्र असणाऱ्या समित्यांची निवड केली असून मुंबई महानगरपालिकेला द्वितीय आणि नवी मुंबई महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. मीरा-भार्इंदर महानगरपालिका व औरंगाबाद महानगरपालिकेला उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या यशाबद्दल महापालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. (प्रतिनिधी)