पश्चिम रेल्वेत महिलांची मनमानी, गर्दी टाळण्यासाठी लोकलचे दरवाजे केले बंद
By Admin | Updated: November 8, 2016 14:47 IST2016-11-08T13:14:27+5:302016-11-08T14:47:23+5:30
गर्दी टाळण्यासाठी महिलांनी लोकलचे दरवाजे बंद केल्याची घटना पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-विरार ट्रेनमध्ये घडली.

पश्चिम रेल्वेत महिलांची मनमानी, गर्दी टाळण्यासाठी लोकलचे दरवाजे केले बंद
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - विरारकडे येत असलेल्या लोकलमधील पुरूषांच्या डब्यात सहा प्रवाशांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच गर्दी टाळण्यासाठी महिलांनी लोकलचे दरवाजे बंद केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हाणूवरून चर्चगेटला झालेल्या लोकलमध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. ही लोकल सकाळी ८.३०च्या सुमारास विरार स्टेशनमध्ये आली असता गर्दी वाढू नये म्हणून महिलांनी लोकलच्या डब्याचे दरवाजे बंद ठेवल्याचे निदर्शनास आले व तणाव निर्माण झाला. महिलांनी तक्रार केली असता पोलिस व आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गाडी थांबवून दरवाजा उघडला व इतर महिला प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला.
गेल्या महिन्यात डहाणू लोकलमध्ये विरार वसई च्या पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी आरपीएफने कारवाई करून 11 प्रवाशांना ताब्यात घेतले होते.