शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत मृत समजून फेकून दिलेली महिला जीवंत

By admin | Updated: August 1, 2016 20:53 IST

पतीने जबर मारहाण केल्यानंतर पत्नी मयत झाल्याचा समज करुन तिला एका शेतात फेकून देण्यात आले. रात्रभर शेतात पडून असलेली महिला जीवंत असल्याचे निदर्शनास

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. १ - पतीने जबर मारहाण केल्यानंतर पत्नी मयत झाल्याचा समज करुन तिला एका शेतात फेकून देण्यात आले. रात्रभर शेतात पडून असलेली महिला जीवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस व गावकऱ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.जिंतूर तालुक्यातील चारठाणा शिवारात रविवारी रात्री पाऊस झाल्याने शेतात चिखल झाला होता. सोमवारी सकाळी सकाळी ६ च्या सुमारास रस्त्यावरुन जात असताना एका शेतकऱ्यास चारठाणा शिवारात प्रकाश देशमुख यांच्या शेतात सविता संजय गिरी (२३) ही महिला जखमी अवस्थेत पडली असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती चारठाणा पोलिसांना देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे, बीट जमादार एस.आर.वायाळ, पोलिस नाईक मंचक जाधव, पोकॉ.बी.एस.इघारे, प्रकाश देशमुख आदींनी घटनास्थळी जावून जखमी महिलेला बाहेर काढले. तेव्हा ती शुद्धीवर होती. चारठाणा पोलिसांनी आपल्या वाहनातून तिला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करुन तिला परभणी येथे हलविले. सध्या परभणीतील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सदर महिला ही २३ वर्षाची असून तिचे मूळगाव परभणी तालुक्यातील सिंगणापूर हे आहे. नगर जिल्ह्यातील संजय उत्तम गिरी याच्याशी तिचा विवाह झाला होता. संजय गिरी याने सविता हिला लोखंडी रॉडने व गजाने मारहाण केली. त्यानंतर श्रीरामपूर येथून एका वाहनाने ३१ जुलैच्या मध्यरात्री तिला घेऊन तो निघाला. पत्नीचा मृत्यू झाल्याची शंका त्याला आल्याने त्याने चारठाणा शिवारात सविता हिला फेकून दिले. रात्रीपासून ती या शेतात पडून होती. १ जुलै रोजी चारठाणा ग्रामस्थ व पोलिसांनी सविता हिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पती पोलिस ठाण्यातइकडे चारठाणा पोलिस आणि ग्रामस्थांनी या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तर दुसरीकडे सदर महिलेचा पती संजय गिरी हा औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात स्वत:हून दाखल झाला. त्या ठिकाणी त्याने पोलिसांना केलेल्या कृत्याची माहिती दिली. चारठाणा परिसरात पत्नीला फेकल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर औरंगाबाद पोलिस ठाण्यातून चारठाणा पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. दरम्यान, चारठाणा पोलिस ठाण्याचे जमादार एस.आर.वायाळ, बी.एस.इघारे हे औरंगाबाद येथे रवाना झाले असून आरोपी संजय गिरी यास चारठाणा पोलिस ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती मिळाली.