लोकलमधून पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू, २ जखमी
By Admin | Updated: December 1, 2015 19:51 IST2015-12-01T19:51:21+5:302015-12-01T19:51:21+5:30
रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

लोकलमधून पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू, २ जखमी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-लोणावळा लोहमार्गावर देहूरोडच्या बापदेवनगर येथे आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
निकीता संजय आगरवाल (वय १८, रा. देहूरोड) असे या अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर यात तिची मैत्रिण हर्षदा शंकर तलारी (वय १९, रा. देहूरोड) आणि निकीताच्या बचावासाठी आलेला धनराज तोडकर (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्षदा व निकीता या पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.