वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून महिलेला जाळलं

By Admin | Updated: October 17, 2014 22:56 IST2014-10-17T12:11:44+5:302014-10-17T22:56:41+5:30

वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून महिलेला जिवंत जाळल्याची घटना नाशिकजवळ घडली आहे.

The woman was burnt as she voted for a different candidate | वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून महिलेला जाळलं

वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून महिलेला जाळलं

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १७ - वेगळ्या उमेदवाराला मत दिलं म्हणून महिलेला जिवंत जाळल्याची घटना नाशिकजवळ घडली आहे. यात संतापजनक प्रकारात गंभीर जखमी झालेली महिला (वय ६०) मृत्यूशी झुंज देत असून नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेवरून निवडणुकीची पातळी किती खाली गेली आहे आणि अवघ्या एका मतासाठी माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात हे समोर येत आहे.

येवला तालुक्यातील बाभूळगावात हा संतापजनक प्रकार घडला असून पीडित महिलेला आरोपींनी एका विशिष्ट उमेदवारास मत देणयास सांगितले. मात्र त्या महिलेला नीट दिसत नसल्याने तिने चुकून दुस-या उमेदवारासमोरील बटण दाबत त्याला मतदान केले. आरोपींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी त्या महिलेला जाब विचारत तिला बेदम मारहाण केली. मात्र एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले. या घटनेनंतर पीडित महिलेला उपचारांसाठी तातडीने नाशिकच्या शासकीय  रुग्णालयात हलवले. मात्र तिला आरोपींपासून धोकाकायम असल्याने तिच्यावर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बाभूळगावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या प्रकरणी येवला पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

Web Title: The woman was burnt as she voted for a different candidate